पारोळा येथे जय हिंद प्राथमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन व बक्षीस वितरण….
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
येथील जयहिंद प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध उत्कृष्ट उपकरणे सादर केली,यावेळी उपकरणे सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विज्ञान शिक्षिका सरिता ठाकरे यांनी केले होते.तीन गटात हे प्रदर्शन घेण्यात आले.प्रत्येक गटातून प्रथम,द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.पाचवीच्या पहिल्या गटातून शेती विषयाला लीना महाजन ( प्रथम) तर ध्वनी उपकरणाला दामिनी चौधरी( द्वितीय ) सहावीच्या दुसरा गटातून घरगुती कुलर या उपकरणाला यश चौधरी (प्रथम), भाजीपाला साठवण या उपकरणाला मोहिनी महाजन व तेजस महाजन यांना (द्वितीय),तर पाणी अडवा पाणी जिरवा या माहितीला राजश्री पाटील ( तृतीय ), सातवीच्या गटातून पाण्याचे नियोजन या उपकरणाला वैभवी भोई (प्रथम ) तर घनतेचे परिणाम या उपकरणाला रुपेश भोई व लक्ष्मीकांत महाजन यांना (द्वितीय), हवेची निर्मिती या उपकरणाला पवन पाटील,लकी साळुंखे यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.या विज्ञान प्रदर्शनात ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी तेजस केदारने विज्ञान विषयावर माहिती सांगितली.विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून उपशिक्षक हंसराज देशमुख, गुणवंत चौधरी, सागर कुमावत यांनी काम पाहिले,विजेता विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सुरेखा पाटील,उपशिक्षक किशोर पवार,उपशिक्षिका संगीता पाटील, विज्ञान शिक्षिका सरिता ठाकरे, वना महाजन,हंसराज देशमुख,सागर कुमावत,किरण विसावे व गुणवंत चौधरी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
सूत्रसंचालन उपशिक्षक वना महाजन यांनी केले आभार किरण विसावे यांनी मानले.