गोवा ऑॅलिम्पिक संघटनेकडून टोकिओ ऑॅलिम्पिकविषयी जनजागृती आणि प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
पणजी प्रतिनिधी
15 जुलै
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री तसेच गोवा ऑॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी आज राज्यात टोकिओ ऑॅलिम्पिकविषयी जनजागृती आणि प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
गोवा ऑॅलिम्पिक संघटनेकडून 23 जुलै ते 8 ऑॅगस्टदरम्यान दररोज कदंब बसस्थानक, पणजी आणि आगाखान सार्वजनिक उद्यान, मडगाव येथे दैनंदिन क्रीडा सत्रांचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. तसेच प्रक्षेपणानंतर दररोज राज्यातील नामवंत खेळाडूंचा दोन्ही ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे.
याशिवाय उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांत सायक रॅली, मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच म्हापसा येथील इनडोअर स्टेडिअममध्ये टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. रोटरी क्लबच्या सहाय्याने शाळांसाठी ऑॅलिम्पिक प्रश्नमंजूषेचेही आयोजन करण्यात आले आहे. गोवा ऑॅलिम्पिक संघटनेचे माजी पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गोव्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
गोवेकरांनी पुढाकार घेऊन भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, जेणेकरुन राज्यात क्रीडा संस्कृती रुजेल, असे श्रीपाद नाईक म्हणाले. टोकिओ ऑॅलिम्पिकचे 23 जुलै ते 8 ऑॅगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.