15 सप्टेंबर रोजी पेन्शन आणि डाक अदालतीचे आयोजन

पणजी, 27 ऑगस्ट 2021

गोवा टपाल विभागाने 15 सप्टेंबर 2021 रोजी पेन्शन आणि डाक अदालतीचे आयोजन केले आहे. सकाळी 11.00 वाजता वरिष्ठ टपाल अधीक्षक, पणजी यांच्या कार्यालयात डाक आणि पेन्शन अदालत पार पडणार आहे.
टपालसेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा आणि टपाल खात्यातील निवृत्तीधारकांच्या तक्रारींची दखल यात घेतली जाईल. 
संबंधितांनी आपली तक्रार वरिष्ठ टपाल अधीक्षक, पणजी यांच्याकडे 09 सप्टेंबरपर्यंत पाठवावी.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!