पाचोरा येथील विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सहभाग. सलग तिस मिनीटे स्केटिंग करून केला विश्वविक्रम

पाचोरा (प्रतिनीधी)— जन्माला आल्यानंतर सर्वचजण चाकोरीबध्द आयुष्य जगात.माञ या चाकोरितुन बाहेर काढुन स्वतःला जगापुढे सिध्द करणारे मोचकेच असतात.असाच काहीसा प्रयोग शारिरिक शिक्षण शिकविणारे सुनिल मोरे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांन सोबत केला. वर्ल्डवाईड इव्हेंट्स प्लॅनर्स प्रेझेंट तर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये सहभाग घेउन सलग तिस मिनिटे स्केटिंग करण्याचे कार्य करून शहरातिल 10 विद्यार्थ्यांचा या कार्याची आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.

शहरात गणराज स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमीच्या माध्यमातुन खेडाळुंना त्यांच्या खेळाच्या साहित्यांसोबतच त्यांना लागणारी आवशक ती साहीत्य तालुका पातळीवर उपलब्ध करून देणारे सुनिल मोरे यांनी शहरातिल विविध शाळांमध्ये पीटीचे शिक्षक म्हणुनही काम केले आहे. विद्यार्थ्यांना शारिरिक शिक्षण देण्यासोबतच तायकाॅंदो,कराटे,योगा,स्केटिंग व नृत्य अशा विविध कलागुणांना तंञशुध्द प्रशिक्षण देउन त्यात नैपुण्यता आणण्याचे कार्य गेली 15 वर्षापासुन करित आहेत. हे चाकोरीतिल आयुष्य जगतांना त्यांच्या कार्याची दखल विद्यार्थ्यांना राष्टिय पातळीपर्यंत नेणारी ठरली असली तरी पाचोर्‍यातिल विद्यार्थ्यांच्या या गुणांची दखल जागतिक पातळिवर घेण्यात यावी ही तळमळ गेल्या अनेक वर्षांपासुन त्यांच्या मनात होती. करोना काळातही शासकिय नियमांचे पालन करून शहरातिल भडगाव रोडवरिल शक्तिधाम येथे विद्यार्थ्यांना शारिरिक शिक्षणासह तायकाॅंदो,कराटे,योगा, स्केटिंग व नृत्याचे धडे देण्याचे कार्य त्यांनी न थांबता अविरत सुरूच ठेवले.अशात 25 ते 27 जून ला वर्ल्डवाईड इव्हेंट्स प्लॅनर्स प्रेझेंट तर्फे जागतिक पातळिवरहोत असलेल्या स्केटिंगच्या उपक्रमाची माहीती त्यांना प्राप्त झाली.या घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड 2021 ला आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून पाचोर्‍याचे नाव जागतिक पातळिवर पोहचविण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरण्याची नामी संधी त्यांना मिळाली.त्यांनी भडगाव रोडवरिल शक्ती धाम येथे आपल्याच प्रशिक्षण केंद्रातिल दहा मुलांची निवड करून त्यांच्याकडुन तिस मिनिटे स्केटिंगचा सराव करून घेतला.
अखेर 28 जुन हा दिवस उजाडला आणी गणराज स्पोर्ट्स स्केटिंग अकॅडमीच्या 10 विद्यार्थ्यांनी सलग 30 मिनिटे स्केटिंग करून आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पाचोरा शहराचे नाव नोंदविले आ.हे यात विक्रमात सहभागी झालेले आयुष मोरे,आराध्य पाटील,अथर्व मराठे,नील सोनवणे, रियांश पाटील, विवेक गायकवाड, अक्षय चव्हाण, श्रेयस शिंदे, अतिक साटोटे, ईशान मोरे, यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल बोलतांना सुनिल मोरे म्हणाले की, सर्व पालक वर्ग यांनी आणि सतत विद्यार्थ्यांनसह मला प्रोत्साहन व प्रेरणा देणारे रमेश मोर यांनी दिलेले पाठबळ दाखविलेला विश्वास आणी मुलांनी केलेले अथक परिश्रम यातुन हे यश मिळाले आहे.हे सर्व यश माझ्या अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांचे असुन मी निमित्तमाञ असल्याची प्रतिक्रिया दिली.पाचोर्‍याचे नाव जगभर नेणार्‍या या चिमुकल्याचे पाचोरा शहरासह पंचक्रोशित अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!