वनसगांव विद्यालयात लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन तथा चिंतन दिन साजरा….
स्काऊट गाईड विभागाचा उपक्रम
निफाड प्रतिनिधी – ( रामभाऊ आवारे )
वनसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार दि. २२ फेब्रूवारी, २०२३ रोजी स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन चिंतन दिन म्हणून स्काऊट गाईड विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी.डी.रोटे हे होते. सर्वप्रथम स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले. इ.९ वी व १० वी अ मधील स्काऊटस् आणि गाईडस् यांनी स्काऊट गाईड प्रार्थना व झंडागीत म्हटले.तद्नंतर आनंद मेळावा तथा खरी कमाई सेवा महोत्सव २०२२-२३ यामध्ये सहभाग घेतलेल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव याप्रसंगी करण्यात आला. तेजस विरोळे (७अ),महेश अर्जुन भालेराव (१० ब),प्रेरणा संदेश डुंबरे व नम्रता गावडे (१० अ) या विद्यार्थ्यांना स्कार्फ ओगल देऊन सन्मानित करण्यात आले .तर अथर्व संजय शिंदे(७अ) , नमन सतीश चौधरी व यश नवनाथ जेऊघाले (५अ),अद्वित हरीश शिंदे (५अ), सिद्धिका मंगेश शिंदे (१० वी अ)या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड विभागाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .इ. बारावी च्या विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या कुंड्यांमध्ये विविध प्रकारचे वृक्षांचे वृक्षारोपण चिंतन दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक, वर्गमंत्री व स्काऊट गाईड विद्यार्थी -शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .याप्रसंगी उपशिक्षक ज्ञानेश्वर कुशारे यांनी स्काऊट गाईड चळवळ जीवनात का महत्त्वाची आहे याविषयी आपले विचार व्यक्त केले. स्काऊट विभाग प्रमुख दिपक गायकवाड यांनी स्काऊटचे वचन व नियम तसेच विद्यार्थी म्हणून स्काऊट गाईड शिक्षणाच्या विविध पायऱ्या याविषयी विवेचन करताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .आभार प्रदर्शन पर्यवेक्षक के. बी .दरेकर यांनी केले. अतिशय उत्साहात स्काऊट गाईड विभागाचा ‘चिंतन दिन’ हा उपक्रम संपन्न झाला.स्काऊट गाईड ध्वज उभारणीसाठी ज्येष्ठ शिक्षक अरुण वाघ, रत्नाकर केदारे यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यालयातील उपशिक्षक अर्जुन चव्हाण, भिका भवर ,मनीराम महाले, नितीन पिंगळे ,अरविंद वसावे , अनिल वाघ, बाळासाहेब गांजवे, आनंदा आहिरे, प्रीती काळे, कुंदन जाधव , दीपक गायकवाड , ज्ञानेश्वर कुशारे, उमा चव्हाण, ममता वळवी, सुनील गांगोडे, संदीप वन्से, उमेश कुमावत, रत्नाकर केदारे मनिषा मेनगर, विजय पांगुळ ,योगिता जाधव ,गणेश कोलते,सुनीता शिंदे, वैशाली रायते, सोमनाथ जाधव, अश्विनी पोकळे, सोमवंशी सर ,नितीन निकम,भाऊसाहेब धामणे ,प्रशांत शिरसाट , शांताराम पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.