श्रीक्षेत्र गोरक्षनगर वनसगाव येथे धर्मनाथ बीज महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न….
धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता..
निफाड प्रतिनिधी – ( रामभाऊ आवारे )
गत अकरा वर्षांपासून सुरू असलेला श्रीक्षेत्र गोरक्षनगर कारवाडी वनसगाव येथील भव्य धर्मनाथ बीज महोत्सव गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला च्या जयघोषात अखिल भारतीय वारकरी मंडळाची नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता करण्यात आली असल्याची माहिती समस्त गोरक्षनाथ मंदिर समिती व भाविकांनी दिली आहे
श्रीक्षेत्र वनसगाव (कारवाडी) येथे गोरक्षनाथ मंदिर, गोरक्ष नगर या पवित्र पावन भूमीमध्ये जगत श्रेष्ठ नवनाथांच्या कृपेने व सद्गुरु सदाशिवनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी शिवगिरी जी महाराज श्री पंचदशनाम जुना आखाडा यांच्या प्रेरणेने , कै टी वाय शिंदे (साहेब) यांच्या संकल्पपूर्तीतून तसेच ह भ प सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज रायते यांच्या मार्गदर्शनातून ओम श्री समर्थ सद्गुरू सदाशिवनाथ महाराज संस्था नाशिक संचलित श्री गोरक्ष मंदिर समिती वनसगाव कारवाडी गोरक्ष नगर,काकडा सम्राट गोटीराम बाबा मांडवडकर व गणपत बाबा लगड सोनेवाडी यांच्या कुशल नियोजनात येथील ग्रामस्थांनी शुक्रवार 20 जानेवारी ते सोमवार 23 जानेवारी अखेर धर्मनाथ बीज सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या महोत्सवात ह भ प राहुल महाराज खालकर भेंडाळी, ह भ प परमेश्वर महाराज उगलमुगले तळवाडे नांदगांव ,
प्रति इंदुरीकर ह भ प रविंद्र महाराज पिंपळगावकर यांचे रात्री कीर्तन,तर सोमवार सकाळी ९ ते ११ अखिल भारतीय वारकरी मंडळाची नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला
प्रमुख उपस्थिती —
श्री दिगंबरा आनंद गिरीजी महाराज तथा हभप अण्णा महाराज कानिफनाथ आश्रम सोनेवाडी, नाथभक्त तानाजी आहेर भुताने, निवृत्ती आथरे, हभप निवृत्ती बाबा शिंदे, लक्ष्मण आप्पा पानगव्हाणे ,मोतीनाना पानगव्हाणे, मधुकर आप्पा शिंदे, जगन्नाथ आहेर, सुभाष भाऊ शिंदे, सुभाष जाधव, भाऊसाहेब आबा ढोमसे, नवनाथ माऊली बोरगुडे ,संजय कोटकर, शंकर घायाळ, शंकरराव कोल्हे, शंकर भवर, अरुण घायाळ, शिंदे जयराम शिंदे उत्तमराव शिंदे, रामचंद्र कापडी, सरपंच महेश केदारे, डॉ योगेश डुंबरे, मनेष शिंदे, गणेश बॅकेचे संचालक उन्मेष डुंबरे, अशोक गारे,टी जी शिंदे, यशवंत शिंदे,गोपाळा शिंदे आदींनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमातील गुणीजन व सहकार्य
गायनाचार्य म्हणून ह भ प ऋषिकेश महाराज नवले सोमठाणे, नवनाथ महाराज बत्तासे, ओंकार महाराज रायते , भास्कर अप्पा गारे, नवनाथ माऊली बोरगुडे ,अरुण घायाळ ,उत्तमराव शिंदे थेटाळे, भाऊसाहेब आबा ढोमसे , अशोकराव गारे ,गोपाळराव शिंदे, राजेंद्र शिंदे,थेटाळे व उगाव भजनी मंडळ पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, विणेकरी म्हणून जयराम बाबा खानगाव, गोटीराम बाबा मांडवडकर, गणपत बाबा लगड सोनेवाडी तर मृदंगाचार्य दत्तू महाराज साळवे यांची मृदुंगाची साथ लाभली तर या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरक्षनाथ मंदिर समिती समस्त कारवाडी ग्रामस्थ, कापडी व शिंदे परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
धर्मनाथ बीज महोत्सव अन्नदाते–
जगन शहाजी शिंदे, विश्वनाथ शंकर कापडी, अशोकराव ढोमसे,व महाप्रसाद अन्नदाते– सोमनाथ त्र्यंबक शिंदे, रामदास भिमाजी शिंदे, भाऊसाहेब सखाहारी शिंदे व समस्त कै टी वाय शिंदे साहेब परीवार वनसगाव.
किर्तन दातृत्व—
योगेश कापडी, राधिका नर्सरी संचालक सुदाम रमेश शिंदे व केशव रमेश शिंदे, माणिकराव रामचंद्र पानगव्हाणे व कै टी वाय शिंदे साहेब परिवारातर्फे सोमनाथ शिंदे,आर बी शिंदे, भाऊसाहेब शिंदे व शिंदे परिवार वनसगाव.
या धर्मानाथ बीज महोत्सवाचे सुत्रसंचलन व आभार वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष रामभाऊ आवारे सर यांनी मानले.