भाजपा मंडळाच्या वतीने लासलगावला रक्तदान शिबिर संपन्न..
रक्तदानात लासलगाव भाजप मंडल अग्रस्थानी
निफाड प्रतिनिधी – ( रामभाऊ आवारे )
भारतीय संविधान दिन, महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी, तसेच मा मंत्री स्वर्गीय ए .टी .पवार यांच्या जयंती निमित भारतीय जनता पार्टी लासलगाव मंडल आयोजित भव्य रक्तदान शिबिर लासलगाव येथे मार्केट कमिटी, कामगार भवन, भगरी बाबा मंदिराजवळ अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली असल्याची माहिती भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णा जगताप यांनी दिली आहे.
लासलगाव भाजपा मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे डी.वाय.एस.पी सोमनाथ तांबे , लासलगाव पोलिस ठाण्याची ए पी आय राहुल वाघ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य डि के नाना जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णाताई जगताप , नासिक मर्चंट बँक व्हा चेअरमन प्रकाश दायमा, ओबीसी हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास शेठ सोनवणे, सोपान काका दरेकर, कोटमगाव सरपंच तुकाराम गांगुर्डे, मंडल उपाध्यक्ष रवींद्र होळकर, शहराध्यक्ष योगेश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र चाफेकर, कोषाध्यक्ष बापू लचके ,उत्तम शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
रक्तदान महाश्रेष्ठ दान असुन कोरोना काळातील रक्ताचा जाणवत असलेला तुटवडा यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक भाजपा मंडलामध्ये हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.लासलगाव मंडलामध्ये सगळ्यात जास्त रक्तदान करण्यात आले. प्रत्येक मंडलातील आकडेवारीनुसार लासलगाव मंडलामध्ये एक नंबर चे रक्तदान झाले.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी भाजपा मंडल पदाधिकारी, डी के नाना फ्रेंड सर्कल यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा मंडल अध्यक्ष स्मिता कुलकर्णी यांनी केले. आभार योगेश पाटील यांनी मानले यावेळी शहराध्यक्ष शैलजा भावसार ,जिल्हा चिटणीस ज्योती शिंदे, मंडल उपाध्यक्ष रूपा केदारे, जिल्हा सदस्य रंजना शिंदे ,सिंधुताई पल्लाळ, मंडल उपाध्यक्ष भारती महाले, संजय शेवाळे , गणेश इंगळे, गणेश निकम, विजय पवार, सोनू जगताप, साहेबराव पाटील ढोमसे, धनंजय डुंबरे,छोटुकाका पानगव्हाणे, सादिक भाई शेख ,श्वेता लचके, नितीन शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते अभियानातील प्रथम रक्तदान प्रितम पवार यांनी केले तर आयुष्यातील प्रथम रक्तदाता प्रथमेश कुलकर्णी प्रथम महिला रक्तदाती ऐश्वर्या जगताप यांनी रक्तदान केले राष्ट्रीय स्वयं संघ संचलित जनकल्याण रक्तपेढी तसेच भाजपा लासलगाव मंडलातर्फे प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले भविष्यातही असे उपक्रम सातत्याने घेतले जातील व आपली सामाजिक जबाबदारी ओळखून राष्ट्रीय कर्तव्य प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन भाजपा महिला जिल्हाध्यक्ष नाशिक ग्रामीण सौ सुवर्णा ताई जगताप यांनी केले.
@@ लासलगाव भाजपा मंडळाच्यावतीने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून भाजपा मंडलातील ४२ गावातील पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम करून या उपक्रमांसाठी प्रतिसाद देत सहकार्य केले. नासिक जिल्ह्यातील १७ मंडळांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या १७ मंडळांमध्ये लासलगाव भाजपा मंडलाने प्रथम क्रमांक पटकाविला असून या ठिकाणी ५२ रक्त पिशव्या कलेक्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी सर्वच भाजपाच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. बहुतांश महिलांना रक्तदान करण्याची इच्छा असतानाही हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी, डायबेटिस, ब्लडप्रेशर आदी कारणांमुळे त्यांना या उपक्रमात सहभाग घेता आला नाही ही एक खंत वाटते. महिलांचे हिमोग्लोबिन कमी असण्याचे कारण शोधून जनजागृती करणे गरजेचे असल्याने भविष्यकाळात महिलांचे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आपण उपक्रम राबवणार असून या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य केले तसेच आगामी उपक्रमात ही सहकार्य करावे ही विनंती.
सौ सुवर्णा जगताप जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी