भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करा….
निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी..
निफाड प्रतिनिधी– ( रामभाऊ आवारे )
भारतीय जनता पार्टीच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक विधान केल्यामुळे त्यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम ४९९,५००,५०४ व माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्याची मागणी निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे याबाबत आमदार दिलीपराव बनकर यांच्या उपस्थितीत आज निफाड पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे
निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यानी २७/१०/२०२१ रोजी दुपारी फेसबूक या सोशल मीडियावर पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचे बाबत व्यसनाधिनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राजकीय अध्यक्षांची तोंड कापावे लागले आहे त्यांच्या प्रवक्त्या कडून नशा मुक्ती चे समर्थन कसे केले जाईल “वो तो बस अपने मालीक का धर्म निभा रहे है “अशाप्रकारचे आक्षेपार्ह व बदनामीकारक विधान केले आहे त्यांनी केलेल्या विधानामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन जनमानसातील आक्रोश निर्माण झालेला आहे पवार साहेबांच्या असलेल्या आजारपणावर केलेले वक्तव्य निषेधार्थ असल्यामुळे व कायद्याच्या चौकटीत गुन्हेगारी प्रकारच्या असल्यामुळे अशा वक्तव्यामुळे साहेबांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे चहात्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे चाहत्यांकडून तुषार भोसले या व्यक्तीवर कायदेशीर रित्या योग्य कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा तसे न झाल्यास समाजामध्ये शांतता भंग व अराजकतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे शरदचंद्रजी पवार साहेब हे दुर्धर आजाराने पीडित असल्यामुळे त्यांचे विषयी तुषार भोसले यांना संपूर्ण कल्पना असताना देखील अशा प्रकारची बदनामीकारक त्यांची राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन या दुष्ट हेतूने वक्तव्य केले आहे अशा विधानामुळे धर्माधर्मात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची कोणतीही घटना समाजामध्ये घडल्यास घटनेस सर्वस्वी तुषार भोसले हे जबाबदार राहतील अशा सामाजिक विकृतीचा निषेध होऊन अशा व्यक्तीविरुद् योग्य कारवाई करणे गरजेचे आहे तसे न झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाऊन अशांततेचे वातावरण निर्माण होईल या सर्व गोष्टींचा विचारून तुषार भोसले यांचे विरुद्धभा.द.वि कलम ४९९,५०००,५०४ व माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी आमदार दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर पाटील कुंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इरफान भाई सय्यद, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकरराव शेलार ,निफाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी राजे ढेपले ,शिवाजीराव बोरगुडे ,दिलीप कापसे उन्मेश डुंबरे ,राजेंद्र कुटे, बापू कापसे,जावेदभाई शेख, कचेश्वर दुसाने, बाळासाहे रंधवे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !