पर्यावरण संतुलनासाठी “एक व्यक्ती -एक झाड” संकल्पना राबविणे गरजेचे— रामभाऊ आवारे.

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे )

गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे प्रदूषणाचे मोठे संकट उभे राहिले असून जमिनीची धूप प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने त्याचा उत्पादकतेवर निश्चित परिणाम होत आहे यामुळे दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस वाढत असून या दुष्काळाचा सामना करताना सर्व सजीवांना आटापिटा करावा लागतोय हे आपण दैनंदिन व्यवहारात बघतो आहे. जलसंवर्धनभावी नद्या आटल्या तसेच त्यांचे नाल्यात रूपांतर झाले.जल-जमीन-जंगल या तीन गोष्टींचा प्रचंड विनाश झाला परिणामी अतिवृष्टी अवर्षण आणि तापमान वाढ अशा आपत्तीचा सामना करावा लागतो आहे ही आपत्ती नैसर्गिक म्हटले जाते परंतु खरेतर की मानवनिर्मितच आहे हे विसरून चालणार
नाही. आपणच ओढवून घेतलेल्या आपत्तीतूनआपल्याला मार्ग काढावा लागणार असून त्यासाठीजल-जमीन- जंगल त्यांचे संरक्षण आणि संवर्धन शिवाय पर्याय नाही
पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जनआंदोलन उभारून’ एक व्यक्ती एक झाड ‘ही संकल्पना खऱ्या राबविणे गरजेचे आहे असे पर्यावरण विषयक विचार संतचरीत्र गृप महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख तथा उपाध्यक्ष माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना (महाराष्ट्र राज्य) रामभाऊ विठ्ठलराव आवारे (वनसगाव) यांनी मांडले आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्यापक पातळीवर काम करण्याचा विचार करणे काळाची गरज बनत चालली आहे.भगवान श्रीकृष्णाने असे सांगितले की जगात अमर फक्त वृक्षच आहे ते कधी मृत्यू पावत नाही कारण त्यांच्या अवतीभोवती बि -बिया पडून नवीन झाड उगवत राहते. वृक्षांनी पृथ्वीचे तेज आणि सत्व कायम राखले आहे. यावर नीतिशतक असं म्हणतोय की– वृक्ष फार लवती फळ भारी ताप साहून देती निवारी! थोर ना करि विभवाचा हा स्वभाव उपकारी जनांचा!! वृक्षांची महती या
चार ओळींमध्ये अतिशय प्रभावीपणे सांगण्यातआले आहे फळे देणारा, विसावा देणारा, सावली देणारा पृथ्वीवरच्या सर्व प्रकारच्या जीवनाच्या वाढीसाठी हातभार लावणारा निसर्गाचे रक्षण करणारा हा वा सदेव माणसाच्या मदतीला आला आहे मात्र आपण कृतज्ञतेने आपले जीवन सुरक्षित करणाऱ्या वृक्षावर कुहाड चालवली तर
आपल्या जन्मदात्या वरच वार करण्यासारखे हे
आहे पण आपण हे लक्षात घेतले नाही त्यामुळे
आज आपल्यासमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले
आहे .दुष्काळापासून ते हवामान बदला पर्यंतच्या
अनेका अनेक संकटांना आपण आमंत्रण देतआहोत ही संकटे दिवसेंदिवस गंभीर होत आहे.आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.या संकटाची तीव्रता कमी करणे आणि पुन्हा साराआसमंत हिरवागार करणे काळाची गरज आहे. निसर्गावरच आपले जीवनमान अवलंबून
आहे त्यांच्या सान्निध्यातच आपण निरोगी जीवन
जगू शकतो परंतु आपल्या सभोवताली असलेले
डोंगर, नद्या ,झाडे, वेली ,पशु-पाखरे यांची साथ संगत दुर्मिळ होत चालली आहे. अमाप वृक्षतोड आणि त्यामुळे उद्ध्वस्त होत चाललेली वने -जंगले यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे त्याची झळ आपल्याला मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे हे चित्र बदलण्यासाठी वृक्षलागवडीचे जन आंदोलन उभारण्याची वेळ आता आली आहे.अलीकडच्या काळात निसर्गचक्र विस्कळीत झाल्याचे आपल्याला अनेकदा जाणवते. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी कधी गोठवणारी थंडी कधी अक्षरशः भाजून काढणार ऊन अशा बाबी वरून निसर्ग बदलत असल्याचे आणि अनेक त्यातूनही निसर्गचक्र बिघडत असल्याचे वारंवार दिसते. या बदलांचे दुष्परिणाम कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे ही
बाब गांभीर्याने घेतली नाही तर भविष्यकाळात ते
अधिक तीव्र बनत जाणार असून आपली शेती पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसावर अर्थात मान्सूनवर अवलंबून आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे पण हवामान बदलामुळे पावसाची वेळापत्रकही कोलमडले आहे प्रमाण कमी-अधिक होते आहे बेभरवशाच्या मान्सूनमुळे शेती संकटात
सापडली आहे भूजल साठे वृक्षांमुळे कमी झाले आहे या साऱ्या बाबी थेट तुमचे आमचे रोजचे जगणे अधिक बनवणारे आहेत त्यामुळे या समस्यांच्या पार्श्वभूमीवर येणारा काळ हा पर्यावरणदृष्ट्या आव्हानात्मक आणि साऱ्या जगाची कसोटी पाहणारा असेल यात शंका नाही.पृथ्वीवर शांत स्वस्थ जीवन जगायचे असेल तर जंगलाचे प्रमाण ३३ टक्के असायला हवे महाराष्ट्रात सध्या २० टक्के जमीन ही वनाखाली आहे म्हणजेच आणखी के जमिनीवर खाली यायला आम्ही खरे तर महाराष्ट्रात १३ टक्क्यांनी वृक्ष लागवड वाढवायची असेल तर त्यासाठी अजून चारशे कोटी झाडे लावण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे पण या आव्हाने महाराष्ट्र शासनाने
तीन वर्षात ५० कोटी झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. वृक्षलागवड व हरित महाराष्ट्रसाठी विविध उपक्रम राबवले जाणे गरजेचे असून समृद्ध अभयारण्यासाठी निसर्गपर्यटन स्थापना वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन वन्यजीव विकास निधीची स्थापना शहरीकरणावर झाडे लावण्यासाठी राज्याच्या कुठल्या भागात किती जागा उपलब्ध आहे याची माहिती मिळविणे गरजेचे आहे.झाडे लावण्याची जगवण्याची आस्था प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनात आहे त्या असलेला खतपाणी घालण्याची जबाबदारी शासनाने उचलले आहे. शासन स्तरावर महावृक्ष लागवड अभियानाला आकार देत असताना सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून झाडे लावणारी आणि ते जगणारे हात हवे आहेत .पृथ्वीचे वाढत जाणारे तापमान ,हवामान ,ऋतू, वातावरण बदल,पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळ, कार्बनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन ,समुद्र पातळीत होणारी वाढ व वेळ हो चालेल तर आणि इतर अनेक नैसर्गिक आपत्ती यामुळे मानवी समूहासमोर खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे. या सर्व बाबींची तीव्रता
आणि दाहकता कमी करून निसर्गाचा समतोल आणि जैवविविधतेचे जतन करण्याची आवश्यकता आहे .त्यासाठी अनेक पर्यायांपैकी वृक्ष लागवड आणि संगोपन हा सर्वात परिणामकारक पर्याय जागतिक स्तरावर समोर आला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता पर्यावरण
संतुलनासाठी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जनआंदोलन उभारून’ एक व्यक्ती एक झाड ‘ही संकल्पना खऱ्या अर्थाने राबविली तर पर्यावरण संमतोल व्यवस्थित राहण्यात हातभार लागेल.
.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!