लासलगावला कंटेनरने बसचालकला चिरडले- चालक ठार.
ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात लासलगाव आगारावर शोककळा—
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर या बसगाडी साठी बस क्रमांक एम एच १४ -३६४१ ही बस आज सकाळी लासलगाव बस आगारात प्रवेश घेत असताना कंटेनर नंबर एम एच ४३ वाय ७४६३ ने धक्का दिल्याने बसचे चालक एस. पी.निकम यांनी खाली उतरून पाहणी करीत असतांना कंटेनरने या चालकास फरफटत नेऊन या चालकाचे तुकडे तुकडे करीत ओढून नेले .या दुर्दैवी अपघातात चालक एस. पी.निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लासलगावकर सुन्न झाले. संतप्त बसचालक व वाहक तसेच लासलगाव बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले व बस सेवा बंद पडली.
नाशिक येथून बस चालक एस पी निकम लासलगाव लासलगाव बस आगार व्यवस्थापक समर्थ शेळके राजेंद्र दारके यांचेसह चहा घेतला बस आगारातून घेऊन बस स्थानकात रस्त्याने आत घेत असताना बसला कंटेनरने धक्का दिला अपघात झाला हा कंटेनर चालक भरधाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोल पंप समोर असलेल्या अमित नंदकुमार विरार व सलीम भाई कलर वाले यांचे दुकानांना धडक देत एका स्कुटी गाडीला धडक देऊन कंटेनर थांबला. या अपघातात चालक निकम यांचे चिधड्या रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या कर्मचारी सह दाखल झाले व लासलगाव ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी जगताप व मयुर विस्ते यांनीही मृतदेहाचे तुकडे गोळा करून ॲम्बुलन्स मध्ये टाकण्यात मदत केली व रस्ता पाण्याने धुऊन घेतला