लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीस नवभारत ग्रुपतर्फे सहकार क्षेत्रातील नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्डस् 2021 हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान…

बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप ठरल्या नाशिक विभागातील उत्कृष्ट महिला सभापती…

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

भारत हा कृषिप्रधान देश आहे. संस्कृतीच्या समृद्ध साधनेला विस्तारीत करून काळ्या आईच्या पोटातून विविध प्रकारचा शेतीमाल उत्पादित करण्याचे अजब कौशल्य प्राप्त केलेला या भूमीचा प्रामाणिक सेवक म्हणजे शेतकरी होय.गौरवशाली परंपरा जतन करणाऱ्या या बळीराजाचे हित जोपासत शासन दरबारी असणाऱ्या विविध कृषीपूरक योजना, मूलभूत सुविधा बाजार समितीत राबवून कृषि उत्पन्न बाजार समिती वलयास एक उत्तुंग भरारी मिळवून देणा-या, गेल्या दोन वर्षांपासून ऐन कोरोना कालावधीत व्यापारी व कामगार वर्गाशी समन्वय साधून शेतीमाल विक्री व्यवस्थेचे योग्य नियोजन करून शेतकरी बांधवांना माल विक्रीची सोय करणाऱ्या, तसेच गेल्या 75 वर्षांपासून अमावस्येला लिलाव बंदची प्रथा मोडीत काढून जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज सुरू ठेवणाऱ्या व आशिया खंडातील नंबर एक कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव या बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांना त्यांच्या आदर्शवत व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना नवराष्ट्र CO-OPERATIVE AWARDS 2021 संलग्न Best Female Chairman Of Market Committee या राज्यस्तरीय पुरस्काराने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे गौरविण्यात आले.
आपल्या अमोघ कार्यशैलीने एक स्त्री असूनही सहकारी सदस्यांच्या सहकार्याने अत्यंत कमी कालावधीत आणि सक्षम कृती नेतृत्वात कृषि उत्त्पन्न बाजार समितीस नावलौकिक प्राप्त करून देणाऱ्या कार्यक्षम महिला सभापती सौ. सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांनी राज्याचे दुग्ध विकास मंत्री मा. ना. सुनील केदार, राज्यसभा सदस्य मा. खा. संजय राऊत व नवभारत ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर निमिष माहेश्वरी यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार स्विकारला.यावेळी बाजार समितीचे सदस्य रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, सौ. रंजना शिंदे आदि उपस्थित होते.
नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सहकार क्षेत्रातील अवॉर्ड बेस्ट चेअरपर्सन ऑफ एपीएमसी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाला त्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा ताई जगताप यांचे आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉ सौ भारती ताई पवार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, येवला- लासलगाव मतदार संघ अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य छगनरावजी भुजबळ, मविप्र अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे सरचिटणीस नीलिमाताई पवार,निफाड विधानसभा आमदार दिलीप काका बनकर, चांदवड विधानसभा मतदारसंघ आमदार राहुल दादा आहेर ,जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, माजी आमदार अनिल कदम माजी आमदार कल्याणराव पाटील, नामको व्हाईस चेअरमन प्रकाश दायमा, नाशिक जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर ,जि प सदस्य डी के नाना जगताप, जि प सदस्य डॉ आत्माराम कुंभार्डे, भाजपा सरसंघटक बच्छाव सर ,या जि प अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंढरीनाथ थोरे ,राजाभाऊ डोखळे, सुभाष कराड ,शिवनाथ जाधव, रमेश पालवे, प्रतिष्ठित व्यापारी संतोष शेठ पलोड, राजुशेठ राणा ,भाजपा प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, ओबीसी हक्क समिती प्रदेश अध्यक्ष कैलास सोनवणे, निफाड तालुका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, पं समिती सदस्य संजय शेवाळे, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा मंजुश्री थोरात, कोटमगाव सरपंच तुकाराम गांगुर्डे, सारोळे खुर्द सरपंच दत्तोपंत डुकरे,यतीन कदम, शंकरराव कोल्हे ,लक्ष्मण निकम ,उन्मेष डुंबरे, विलास बापू मत सागर भिमराज काळे सुयोग गिते, वनसगाव सरपंच महेश केदारे, साहेबराव ढोमसे, मधुकर ढोमसे, छोटूकाका पानगव्हाणे, संजय वाबळे, मधुकर खापरे , विनोद जोशी, किरण कुलकर्णी, नवनाथ बोरगुडे, भाजप लासलगाव अध्यक्ष महिला आघाडी स्मिता कुलकर्णी, जिल्हा चिटणीस ज्योती शिंदे, जिल्हा सदस्य रंजना शिंदे, मंडल उपाध्यक्ष नंदा शर्मा, उपाध्यक्ष रूपा केदारे, शहर अध्यक्ष शैलजा भावसार, जिल्हा सदस्य सिंधुताई पल्हाळ, ग्रामपंचयात सदस्य ज्योती निकम, भाजपा कोषाध्यक्ष निलेश लचके, निलेश सालकाडे, ज्येष्ठ नेते राजेंद्र चाफेकर ,अरुण भांबरे, सरचिटणीस नितीन शर्मा,रमेशशेठ शिंदे , सोमनाथ गांगुर्डे, राम बोराडे, रविराज शिंदे ,संदीप गारे, राजेंद्र बोरगुडे ,गणेश डोमाडे, प्रकाश नाना पाटील, अमोल थोरे ,दत्ता पाटील ,विकास रायते, दत्ता काका रायते, विठ्ठलराव कान्हे, पंढरीनाथ रायते, प्रमोद पवार ,बापूसाहेब गारे, दत्तूलाल शर्मा, बबनराव शिंदे, पलोड सर ,डॉ सालगुडे, हिरामण पेखळे, बी आर चव्हाणके ,धनंजय डूंबंरे, संजय गाजरे ,जगन आप्पा कुटे ,आदेश सानप आदींनी अभिनंदन केले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला हा बहुमान बाजार समिती सर्व संचालक मंडळ, शेतकरी वर्ग, कामगार व सर्व घटकांचे वेळोवेळी सहकार्याने मिळालेला असुन सर्वांच्या सहकार्याने शेतकरी हिताचे महत्त्वाचे निर्णय बाजार समितीने घेतली असून त्याचाच एक परिपाक म्हणून आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हा पुरस्कार मिळत असल्याबद्दल सर्व सहकारी सदस्य, शेतकरी, अडते, व्यापारी, माथाडी-मापारी कामगार, मदतनीस व बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच नवभारत ग्रुपच्या संयोजकांचे आभार मानते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!