दिवाळी सणाला कामगार व मजुरांचे आपल्या घराकडे नजरा

आठ दिवस शेतकऱ्यांचे शेतीकामाचे गणित बिघडणार…

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा या उक्तीप्रमाणे वर्षातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण दिवाळी आहे दिवाळीत घरी जाऊन आपल्या वृद्ध आई-वडिल व चिल्या – पिल्या बरोबर आनंद साजरा करावा असे प्रत्येकाला वाटते. घार हिंडते आकाशी तीची नजर पिल्लापाशी या म्हणीप्रमाणे नोकरदार ज्या प्रमाणे दिवाळीची सुट्टी असली की घराकडे प्रयाण करतात त्याच प्रमाणे शेतात काम करणारे मजूर देखील दिवाळीत सुट्टी घेऊन घरी जातात, आठ दिवसावर दिवाळी येऊन ठेपल्याने द्राक्ष पंढरीत पेठ, सुरगाणा ,त्रंबकेश्वर, अभोणा ,माती,बोरगाव तसेच महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेले गुजराती मजूर मोठया प्रमाणात येतात, द्राक्ष बागांची छाटणी, फेल, डिपींग, थिनींग, ही सर्व कामे हे मजूर टेंडर पध्दतीने किती उक्ते काम ठरवुन करत असतात. आपल्या बिऱ्हाडासह द्राक्ष बागांच्या परिसरात एकत्र मिळून वैयक्तिक निवारा करून चार महिने वास्तव्य करत असतात. द्राक्ष हंगामात जवळच रहात असल्यामुळे सकाळी ६ वाजता कामाला लागतात आणि कोणताही व्याप नसल्याने सायंकाळी अंधार होईपर्यंत काम करतात, त्यांच्या या कष्ट आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांना भरपूर कामे मिळतात त्यांच्यामुळे शेतकरी शेतीची कामे करू शकतो, द्राक्ष हंगामात या मजुरांना अनन्या साधारण महत्व आहे. दिवाळी सारखा सण असल्यामुळे त्यांनाही घराची ओढ लागली आहे, इतर सण असले तर फारसे घराकडे जात नाही पण दिवाळी सारखा आनंदाचा सण असल्यामुळे ते घरी नक्की जातात यंदा द्राक्ष हंगाम उशिरा सुरु झाला, पावसाचे अंदाज घेत नुकसान होऊ नये म्हणून उशिरा बागा छाटल्या, नेमकी दिवाळीत खूप कामे आली आहे आणि नेमके मजूर घरी निघाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे, कामे येऊन ठेपली आणि मजूर मिळत नसल्याने वणवण भटकंती करावी लागत आहे पंधरा दिवस मजूर आले नाही तर अनेक कामे खोळंबून राहतील.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील बहुतांश द्राक्ष बागांच्या परिसरात द्राक्ष हंगामातील कामे जोरात सुरु आहे, छाटणी, फेल, डिपींग यासह शेतीची इतर कामे सुरु आहे खरीप हंगामातील पिके काढून रब्बीची पिके उभी करायची आहे पण दिवाळी सण आल्यामुळे सर्व मजूर गावाकडे निघाली आहे, त्यामुळे कामे कशी करावी, मजूर कोठून आणावा असा प्रश्न निर्माण झाला असुन दिवाळी सण संपल्यानंतरच खऱ्या अर्थाने कामाला गती मिळणार असून सद्यस्थितीत द्राक्ष बागांच्या कामाची गणित बिघडले जाणार असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे.

राहुल तोडकर द्राक्ष उत्पादक – ब्राह्मणगाव (वनस)

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!