पिंपळगाव बसवंतच्या जाधव पिता- पुत्राचा दिल्लीत डंका—-
कराटे स्पर्धेत गोल्ड मेडलचे मानकरी—–
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
मनुष्याच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना वाव मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. याच धर्तीवर पिंपळगाव बसवंत येथील जाधव पिता-पुत्रांनी दिल्लीत आपल्या नावाचा डंका गाजवला असून गावासह नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय जित कुन डो कराटे स्पर्धेत पिंपळगाव बसवंत येथील बाप-लेकाने घवघवीत यश संपादन करत पहिला क्रमांकासह गोल्ड मेडल पटकाविले आहे तर थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नारायण जाधव व विनायक जाधव या बापलेकाची निवड झाल्याने दोघांचेही सर्व स्तरातून कौतुकाची होत आहे.
पिंपळगाव बसवंत शहरातील मार्शल आर्टच्या वर्गात गेल्या दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेणाऱ्या नारायण जाधव व विनायक जाधव यांनी दिल्लीत पार पडलेल्या कराटे स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन करत गोल्ड मेडल पटकाविले आहे.तर येत्या काही दिवसात थायलंड येथे पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत या बाप लेकाची निवड झाल्याने सर्व स्तरातून नारायण जाधव व विनायक जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
@@ दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या कराटे स्पर्धेत
आम्हा दोघा बाप लेकाला प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आल्याने हा आमच्या दृष्टीने अभिमानाचा सोहळा होता.पुढील काळात थायलंड येथे होणाऱ्या स्पर्धेचा नियमित सराव सुरू आहे.
नारायण जाधव राष्ट्रीय गोल्ड मेडल विजेते.
@@ आजच्या तरुणाईने क्रीडा क्षेत्रात सहभाग नोंदवून नावलौकिक मिळवावा–
क्रीडा मंत्रालयाने आजच्या सर्व तरुण-तरुणींना आपल्या उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून आपली कला दाखविण्याची एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या व्यासपीठाचा तरुणाईने लाभ घेऊन विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून मेहनतीने यश मिळवून आपले, आपल्या परिवाराचे, आपल्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर पोहचविले पाहिजे याकरिता तरुणाईने क्रीडा क्षेत्रात आपला सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.