तारुखेडलेला नवीन जि. प. शाळा इमारत मिळावी–
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी दिले शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन—
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
तारुखेडले येथील जि. प. शाळा इमारत सन १९१२ मधील असून जवळ १०० वर्ष जुनी आहे व कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित आहे नवीन इमारत होणे आवश्यक आहे त्यासाठी निधीही उपलब्ध व्हावा असे सविस्तर निवेदन तारुखेडले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना दिले. तारुखेडले गावात नवीन पाच वर्ग खोल्या बाबत मागणी पत्र गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती निफाड व शाळा यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि प नाशिक यांना सादर केले आहे परंतु अद्याप समाधानकारक कार्यवाही झाली नसल्यामुळे श्री गवळी यांनी निवेदन दिले.
तारुखेडले येथील जि प शाळेची वाईट अवस्था झाली आहे विभागाचे दुर्लक्ष होत असून कोणी लक्ष देत नाही सध्या असलेली इमारत फार जुनी झाली असून त्याचे प्लास्टर, खिडकी, दरवाजे नादुरुस्त झाले आहेत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती शाळेत होत असते व त्यामुळे मुलांना शिक्षण घेण्यास अडचण होत आहे शाळेच्या आवारातील शेड काम वर्ष पासून अपूर्ण आहे जि प मार्फत शाळेची पाहणी करण्यात आली व शाळा नवीन इमारत आवश्यकता नाही असे सूचित करण्यात आले असे असताना मागील दिवसात शाळेचा ओटा ढासळला त्यामळे सदर इमारत दर्जेदार कशी असा सवाल आहे तसेच भविष्यात काही जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण ? सदर दुरावस्थे बाबत जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग यांच्या स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा केला आहे व करत आहे परंतु समाधानकारक कार्यवाही होताना दिसत नाहीय शिक्षण विभाग फक्त बघायची भूमिका घेत आहे तसेच १०० वर्ष शिक्षण विभाग यांनी या इमारत कडे लक्ष का दिले नाही ?.असा सवाल आहे. तारुखेडले गावात नवीन इमारत उभी राहावी अशी मागणी श्री गवळी यांनी निवेदनात केली आहे