ऐन दिवाळीच्या सणासुदीला जिल्हा बँकेची धडक वसुली -थकबाकीदार शेतकरी वर्गाला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी— प्रभाकर मापारी
थकबाकीदार शेतकरी वर्गाला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी— प्रभाकर मापारी
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
अस्मानी- सुलतानी संकटांनी जगाचा अन्नदाता चिंतातुर झाला असून सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या वसुली ने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निफाड तालुक्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहोचून वसुलीसाठी तगादा लावत आहे.NDCC बँकेमार्फत धडक वसुली निफाड तालुक्यामध्ये एनडीसीसी बँक ही सामूहिक रीत्या पंधरा ते वीस जणांच्या टोळी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कर्ज भरण्यासाठी मागणी करत आहे. नासिक जिल्हा बँकेची सामोपचार कर्जफेड योजनेची मुदत ही 30 ऑक्टोंबर 2021 रोजी पर्यंतच असल्याने फार्म हाऊस व ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेले कर्ज ताबडतोब भरावे असे हे अधिकारी शेतकऱ्यांना संगत असून खरंच सध्याची स्थिती ही वसुलीची होऊ शकते का ? या वर्षी अतिवृष्टी व कोरोणामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे हे लोकप्रतिनिधींना माहित नसतानाही शेतकरी वर्गाला वेठीस धरण्याचा हा प्रकार चुकीचा असून थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी किमान सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेना नेते तथा उगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रभाकर देवराम मापारी यांनी केली आहे.
सरकार मध्ये असलेले आमदार, मंत्री हे शेतकरी नाही का ? निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष हेच परकीय व नगदी चलन मिळवून देणारे प्रमुख पीक असून द्राक्षाचा हंगाम हा जानेवारी ते एप्रिल दरम्यान असतो. सद्यस्थितीत द्राक्ष बागा चा पिकासाठी शेतकरी वर्गालाच भांडवलाची नितांत गरज असतानाच कर्ज वसुली करणे योग्य नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकाकडे लक्ष द्यायची ी जिल्हा बँकेच्या अधिकार्यांना तोंड द्यायचे ? असा यक्षप्रश्न द्राक्ष उत्पादक आणि पुढे उभा राहिला आहे.
नाशिक जिल्हा बँकेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी पूर्णपणे भयभीत झाला आहे. नासिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यातही सध्या द्राक्ष छाटणी सुरू आहे अशा वेळेस शेतकऱ्याने शेतीचे कामे पहायचे का या वसुली पथकाला तोंड द्यावयाचे ? याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज असून अश्या सणासुदीच्या काळात वनस वसुलीस लावलेल्या तगाद्याने एखाद्या शेतकरी वर्गाच्या जीविताचे काही बरे वाईट झाले तर यास सर्वस्वी जबाबदार कोण ? सध्या शेतकरी औषधाचा खर्च कसा करायचा व मजूरी कशी द्यावयाची? या साठी शेतकरी आपल्या घरच्या लक्ष्मीचे (पत्नी) सोने-नाणे सेट, सावकार, सोनाराकडे गहाण ठेवून पाहुणे रावळे यांकडून उसने पासने करून सावकारी टक्केवारीने कर्ज घेऊन खर्च भागवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच या चिंतेत असताना या वसुली पथकास तोंड कसे द्यायचे तेव्हा बँके वाल्यांनी एवढे संख्येने शेतकऱ्याकडे न जाता फक्त एक-दोन प्रतिनिधींनी जाऊन ज्या शेतकऱ्यांची पैसे भरण्याची परिस्थिती असेल अश्या शेतकऱ्याकडून वसुली करावी ही शेतकरी म्हणून माझी कळकळीची विनंती असून वसुली अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर जास्त दबाव टाकू नये. भविष्यात एखादी अघटित घटना घडल्यास यास NDCC बँकेचे अधिकारी जबाबदार राहतील.अशी भाईगिरी थांबवावी नाहीतर शेतकरी वर्गाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. शेतकरी हितासाठी निफाड तालुक्यातील सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचा मेळावा घ्यावयाचा आहे ती तारीख आपणास लवकरच कळविले जाईल अशी शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे.
@@ शेतकरी हा एकच पक्ष म्हणून शेतकरी त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून येणाऱ्या संकटांना सामूहिक रित संघर्ष करण्याची खऱ्या अर्थाने गरज असून
घरात एकटे बसून मनात वेगळा विचार आणल्यापेक्षा एनडीसीसी बँकेच्या जुलमी वसुली धोरणाच्या विरोधात आवाज बळकट करण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कर्ज पिढीच्या मुदतवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मधुकर पुंडलिक ढोमसे- प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान करणी सेना व शेतकरी बचाव कृती समिती निफाड तालुका.
@@ द्राक्ष पिकावर चार पाच वर्षापासून सातत्याने संकटे येत असून दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्यातक्षम द्राक्ष कवडीमोल भावाने विकावे लागल्यामुळे खर्चही फिटला नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी जिल्हा बँकेचे कर्ज फेडू शकला नाही ही सत्य परिस्थिती असून जिल्हा मध्यवर्ती बँकेने तडजोड करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा व राज्य शासनाने द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी.
दतु सुडके —- मा चेअरमन उगाव विकास संस्था.