विनायकदादा पाटील यांच्या जगण्यात सकारात्मकता होती – दिलीप माजगावकर

निफाडला प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनायक दादा ग्रंथाचे प्रकाशन संपन्न—

निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)

विनायकदादा पाटील हे राजकीय क्षेत्रात होते तरीही ते मनाने सामाजिक क्षेत्रात रमणारे होते व आतड्याने सांस्कृतिक जगात वावरणारे होते त्यांच्या जगण्यात सकारात्मकता होती कोणतीही अडचण ,प्रश्न घेऊन गेले की त्यावर ते मार्ग काढायचे असे प्रतिपादन पुणे येथील राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी केले
वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आठवणीतील विनायक दादा’ ग्रंथ प्रकाशन सोहळा शनिवारी निफाड’ येथील हॉटेल रुद्राय येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना दिलीप माजगावकर यांनी वरील प्रतिपादन केले
या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर हे होते तर अतिथी म्हणून माजी आमदार हेमंत टकले व संत साहित्याचे अभ्यासक प्रा डॉ दिलीप धोंडगे , वि. दा. व्यवहारे , नीला पाटील, ज्ञानेश्वरी पाटील ,विजय निपाणीकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्तविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.दा.व्यवहारे यांनी केले प्रमुख अतिथिचा परिचय विजय निपाणीकर यांनी करून दिला
आठवणीतील विनायक दादा’ या ग्रंथाचे प्रकाशन हेमंत टकले यांच्या हस्ते संपन्न झाले
याप्रसंगी बोलताना हेमंत टकले म्हणाले की, विनायकदादांनी अनेक क्षेत्रात माणसं जोडली दादांनी माणुसकीचे धडे दिले व सामान्यपणे जगायला शिकवले त्यांनी मित्रत्वाच्या पलीकडे नाती निर्माण केली विविध क्षेत्रांतील माणसांमध्ये ते रमायचे त्यांच्या जगण्यात बडेजाव नव्हता राजकारण करताना राजकारणाच्या बाहेर वेगळं जीवन आहे हेही त्यांनी शिकवलं असे ते म्हणाले
प्रा. दिलीप धोंडगे आपल्या भाषणात म्हणाले विनायकदादा उत्तम वक्ते होते किती बोलावं मुद्देसूद बोलावे यावर त्यांचा भर असायचा त्यांचं व्यक्तिमत्त्व चतुरस्त्र होत स्वतः आनंदाचे धनी होताना तो आनंद समाजालाही मिळाला पाहिजे हे त्यांचं जगण्यातलं धोरण होत असे ते म्हणाले
याप्रसंगी सुरेश बाबा पाटील, माजी आमदार अनिल कदम ,यतीन कदम, रणजित पाटील, वैकुंठ पाटील, नानासाहेब पाटील, राजेंद्र मोगल, त्रंबकराव गुंजाळ, राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे , शशांक सोनी, मधुकर राऊत, शिवाजी ढेपले, सोहनलाल भंडारी, रतन पाटील वडघुले , विश्वास कराड , संजय कुंदे, विक्रम रंधवे, दत्ता उगावकर, नंदलाल बाफना ,संजय आहेर, आदींसह जिल्हा इतिहास संकलन समितीचे सदस्य उपस्थि9त होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भारती लबांते व गुलाब टकले यांनी केले आभार प्रदर्शन अनिल कुंदे यांनी केले.

फोटो – आठवणीतील विनायक दादा’ ग्रंथ प्रकाशन करतांना माजी आमदार हेमंत टकले , दिलीप माजगावकर , प्रा डॉ दिलीप धोंडगे , वि. दा. व्यवहारे , नीला पाटील, ज्ञानेश्वरी पाटील , विजय निपाणीकर आदी.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!