शाळेला वॉटर फिल्टर चे मोफत पाणी

निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)

खेरवाडी तालुका निफाड येथील माजी सरपंच सौ.शकुंतलाताई रावसाहेब आवारे(आर. डी. आवारे) यांचे चिरंजीव गणेश आवारे व राकेश आवारे यांनी जलदान हे सर्वश्रेष्ठ दान या तत्त्वाला प्राधान्य देत सर्वज्ञ वाटर फिल्टर प्लांट च्या वतीने जि.प.शाळा व हायस्कूल च्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोफत वॉटर फिल्टर चे कायमस्वरूपी पाणी दिल्याने पालक विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे .वैद्यकीय व आरोग्य शास्त्रानुसार पोटाचे 90 % विकार हे दूषित पाण्यामुळे होत असतात. अध्ययन-अध्यापन व आरोग्य याचा जवळचा संबंध आहे .विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले तर त्याचा अभ्यास चांगला, त्याचा अभ्यास चांगला तर उत्तीर्ण होऊन भविष्य उज्ज्वल करण्याचा योग चांगला.या सर्व बाबींचा विचार करून जोपर्यंत सर्वज्ञ वाटर फिल्टर त्यांची सेवा खेरवाडीत सुरू आहे तोपर्यंत या दोन्ही शाळांना मोफत पाणी पुरविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यांच्या या मनाच्या मोठेपणाबद्दल शा. व्य.समिती,ग्रामपंचायत, सोसायटी,विध्यार्थी, शिक्षक, व पालक,तसेच ग्रामस्थांच्या वतीने सर्वज्ञ वॉटर फिल्टरचे आभार मानण्यात आले

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!