नांदुरमध्यमेश्वर धरणास अतिरिक्त १० वक्राकार गेट , नदीपात्राचे रुंदीकरण लवकरच मार्गी लागणार :-
जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीत तत्त्वता मान्यता मिळाल्याची आमदार दिलीप बनकर यांची माहिती—
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार सवांदयात्रे निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील निफाड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आमदार दिलीप बनकर यांच्या मागणी नुसार नांदूरमधमेश्वर ह्या धरणाला भेट दिली असता बऱ्याच कालावधी पासून अपूर्ण असलेला धरण परिसराच्या विविध अडचणी जाणून घेत लवकरात लवकर सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी आमदार बनकर यांना दिली. त्यांनी तात्काळ मंत्रालयात बैठक आयोजित केली या बैठकीत आमदार बनकर यांनी मागणी केली की नांदूरमधमेश्वर धरण हे गोदावरी नदीवरील निफाड तालुक्यातील एकमेव महत्वाचे धरण आहे. गोदावरी या प्रमुख नदीस अनेक प्रमुख नद्या व इतर उपनद्या येऊन मिळतात. सदर विविध नद्यांवर गंगापूर, दारणा, आळंदी, वालदेवी, मुकणे, कडवा आदी धरणांचे तर कादवा नदीला पालखेड, पुणेगाव, ओझरखेड, करंजवण, तिसगाव, वाघाड आदी धरणांचे पाणी येऊन दोन्ही नद्या ह्या नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकत्र येतात. तसेच भविष्यात मराठवाडा भागास याच नांदूरमध्यमेश्वर धरणामधून वळण योजनाचे पाणी जाणार आहे.
नांदुरमध्यमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी येत असल्याने धरण परिसरातील जवळपास ३० ते ३५ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. पर्यायाने मोठ्या प्रमाणात शेतीसह उद्योगधंदे तसेच रहिवासी घराचे नुकसान होत असल्याने नांदुरमध्यमेश्वर धरणास सन २००८ मध्ये एकूण ८ वक्राकार गेट बसविण्याचे काम करण्यात आले. एका वक्राकार गेटची वहन क्षमता हि जवळपास १२५०० क्युसेस इतकी असून ८ वक्राकार गेट मिळून एकूण १,००,००० क्युसेस पाणी या गेट मधून विसर्गित केले जाते. ८ वक्राकार गेटचे काम पूर्ण झाल्यानंतर बाधित गावातील नुकसानीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे त्यामुळे नांदुरमध्यमेश्वर धरणास आणखी १० ते १५ अतिरिक्त गेट बसविल्यास निश्चीतच बाधित होणाऱ्या गावांचे प्रमाण कमी होऊन पुराच्या पाण्याचा विसर्ग हा अधिक क्षमतेने होऊ शकेल. याकरीता जलसंपदा विभागाने CWPRS विभागाकडून सखोल अभ्यास करण्यात येऊन अभ्यासाअंती अंतिम अहवाल प्राप्त झालेला आहे. त्याअनुषंगाने तत्वत: मान्यतेसाठी प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनास सादर केलेला आहे.तरी नदीपात्राचे रुंदीकरण करणे तसेच अतिरिक्त १० वक्राकार गेट बसविणे असे २ पर्याय करावे अशी मागणी आमदार बनकर यांनी केली. त्यानुसार मंत्री महोदयांनी संबंधित प्रस्तावास तत्वता मान्यता तात्काळ प्रधान करावी असे निर्देश दिले तसेच नदीपात्राचे रुंदीकरण व १० वक्राकार गेट बसविणे या कामाचे संपूर्ण रेखाचित्रांबरोबरच रचनेच्या आराखड्यांसह सखोल प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले या बैठकीस विजय गौतम, विशेष कार्य अधिकारी, प्रथम प्रकल्प कक्ष, अजय कोहिरकर, सचिव, लाभक्षेत्रविकास, मुख्य अभंयीता उत्तर महाराष्ट्र प्रदेश डॉ संजय बेलसरे .सह सचिव जलसंपदा स. अ .टाटू उपसचिव पर्यटन विभाग उज्वला दांडेकर.मुख्य अभियंता संजय बेलसरे .अधीक्षक अभियंता अलका अहिरराव .कार्यकारी अभियंता पाटबंधारे सागर शिंदे.उपसचिव जलसंपदा सुदर्शन पगार .राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निफाड तालुका अध्यक्ष राजेन्द्र डोखळे माजी पंचायत समिती सभापती सुभाष कराड , बाजार समिती संचालक नंदकुमार सांगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर कुंदे आदीजन उपस्थित होते