करंजगावला ४१५ नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ
सहकार्याबद्दल आरोग्य प्रशासनाचे मानले आभार
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
जनता विद्यालय करंजगाव तालुका निफाड येथे कोव्हीशील्ड 19 लसीकरण करंजगाव उपकेंद्र येथे पार पाडले या वेळी 415 लसीकरण झाले यामध्ये महिला 252 तर पुरुष 163 लसीकरण झाले करंजगाव उपकेंद्रात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य तसेच आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपल्या गावातील सर्व नागरिकांचे ग्रामपालिके तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले ग्रामपंचायत कर्मचारी सर्वात महत्त्वाचे लसीकरण केंद्रावर असलेले डॉक्टर्स नर्स आशा व ऑनलाइन करणारे सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच आज आपल्या गावांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे शक्य झाले.असेच सहकार्य यापुढेही नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी केले तर आपले गाव शंभर टक्के कोरोना मुक्त होणार यात शंकाच नाही. या प्रसंगी मा.उपसरपंच रामदास राजोळे यांनी जनतेला आवाहन केले कोवीशिल्ड लसीचा पहिला तसेच दुसरा डोस देण्यात येईल,
लस घेण्यासाठी येताना व्यवस्थित जेवण करून यावे,पिण्याचे पाणी सोबत आणावे, लस रांगेत येऊन घ्यावी,कुणीही गर्दी करू नये,येताना मास्क लावणे. सुरक्षित अंतराचे पालन करावे,लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले या नियमांचे पालन करून भाऊसाहेब वामन राजोळे यांना लस देऊन सांगता करण्यात आली या प्रसंगी डॉ पांडुरंग कांडेकर, डॉ राजेंद्र बैरागी, डॉ तडवी मॅडम, डॉ संसारे, डॉ गवळी, डॉ हिंगमिरे, अंगणवाडी सेविका सरला शिंदे,मिरा वल्टे,नंदा राजोळे या कर्मचाऱ्यांसह सरपंच नंदु निरभवणे,उप सरपंच राजेंद्र राजोळे, ग्रामपंचायत सदस्य रामदास राजोळे, सुनिता राजोळे, विलास राजोळे,शंकर पवार,पुंजा भगुरे, रावसाहेब राजोळे, तंटामुक्ती उपअध्यक्ष राम राजोळे सागर राजोळे, कैलास टिळे,सुका भगुरे,अतुल तांबे,सोमा ससाणे, राहुल कामडे यांचें सहकार्य लाभले सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य व अंगणवाडी सेविका यांचे डॉ यांनी आभार मानले