15 ऑक्टोबर पर्यंत द्राक्ष पिकास विमा संरक्षित करा

निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)

सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, पंतप्रधान हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सगळ्यांनी भाग घ्यावा. यावर्षी हवामानाचा अंदाज पाहता अवेळी पाऊस गारपीट कमी तापमान यामुळे आपल्या द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी निफाड तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, 15 ऑक्टोबर पर्यंत सर्वांनी द्राक्ष पिकासाठी विमा उतरवायचा आहे. विमा हप्ता हेक्टरी 16000 रू.व गारपीट पासून विमा संरक्षण हेक्‍टरी 5666 रू. शेतकऱ्यांना बँकेत किंवा सीएससी सेंटर वरून फळपीक विमा उतरवावा. विमा संरक्षित रक्कम 320000 हेक्टरी आहे. जेणेकरून भविष्यातील अवेळी पाऊस, गारपीट ,कमी तापमान या हवामानाच्या धोक्यापासून आपलं द्राक्ष पिकास संरक्षण मिळेल असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बी जी पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!