हिंगलाज मातेचे निस्सीम भक्त – श्री महंत डोंगरपुरी महाराज

नवरात्र विशेष करीता-(रामभाऊ आवारे वनसगाव.८७८८५०४५१२)

श्री डोंगरपुरी महाराजांची संजिवन समाधी शके १२०० मधील असल्याचे सांगितले जाते. श्री. डोंगरपुरी महाराज राजपुरी बाबा लदाणा (हरियाणा) या घराण्याचे चोट्टनमठ तारातिरी (राजस्थान – पाकिस्तान सरहद्द) येथील सन्यासी होते. त्याबद्दल विशेष लेख नाही. डोंगरपुरी महाराज देवीला खेडे येथे का घेऊन आले याची कथा अशी की, श्री हिंगलाज देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्त दुरवरुन येत असत. या भक्तांमध्ये डोंगरपुरी नावाचाही एक निस्सिम भक्त होऊन गेला. त्याने पंचान्हव (९५) वर्षांपर्यंत देवीची वारी केली. आता डोंगरपुरी महाराज पुर्ण थकले होते. आता येथुन देवीला आपल्या नगरात घेऊन जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. देवीलाही त्यांनी तसे सांगितले ते म्हणतात, तू त्या तुझ्या
ठिकाणी पक्के ध्यान ठेऊन पर्वता गुहेमध्ये पाशाणाच्या शय्येवर आहे.आम्ही अनेक देश फिरलो परंतू काही फळ प्राप्त झाले नाही व आपले जातीचा व कुळाचा मान सोडुन देवून सेवा केली परंतू निष्फळ गेली आणि पाहा काही एक आदरमान नसतां परक्याच्या घरी शासक होत्साता कावळ्याप्रमाणे उड्या खात गेलो असे असता अगे हे तृष्णे अजूनकां तू तृप्त होत नाहीस.
दुष्टांची नानाप्रकारची दुष्ट भाषणे आणि त्यांचे सेवे विषयीं तत्पर जे आम्ही यांही सोसून घेतली आणि बुद्धीच्यालोकांच्याही मनोधारणा केल्या, हात जोडणे, पदर पसरणे, पाया पडणे हेही केले असे असता अगे हे निष्फळ आशेयानंतर आणखी कां मला नाचवित्येस माते, आम्ही भोग भोगिले नाही, तर आम्ही आपले वयच खाल्ले. तप तपलों नाही, तर आम्ही आपले वयच भाजून टाकले, काळ गेला नाही तर वय मात्र निघून गेले आणखी आशा म्हातारी झाली नाही तर वय मात्र म्हातारें जाहाले तुझे आमचे अंतर फार दूर आहेच आणि तशातही जर तूं तोंड फिरवीत असलीस तर आम्हीं मुळींच निस्पृहीच आहोत. शेवटी जो उत्तम योगी असतो व त्याच्या पदरी जेव्हा फार पुण्य होते व त्याच्या मनातुन दुसऱ्याची नाशाची बद्धी जेव्हा सर्वाथा- तेव्हा त्यास ईश्वर प्राप्ती होते. तेव्हा त्यांच्या मनातील ओढ, ‘पकीय
कठीण तपश्चर्या पाहन देवीला न राहन देवी निघण्यास तयार झाली, परंतू देवीने डोंगरपुरी महाराजांना एक अट सांगितली. देवी प्रणाली जा तू मागे होऊन पाहिले तर त्या ठायी मी स्थित होऊन जाईन, आणि जा, माझे वचनावर विश्वास असेल तर चित्त स्वस्थ करा म्हणजे सगळे झाले,साधुच्या ईश्वर प्राप्ती विषयी प्रेम गहिवरेकरुन नेत्रास प्रेमाश्रु आले. देवीची अट ऐकुन डोंगरपुरी महाराज तेथुन निघाले व देवी त्यांच्या पाढीमागे निघाली. वाटेमध्ये बऱ्याच तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेत दोघी युटे जात होती बराच काळ चालल्याने दोघेही एक ठिकाणी थांबले माता ज्या ठिकाणी थांबली ते गुजरात मधील कालासर ता. चोटीला, जि.सुरेन्द्रनगर ह्या गावी. तेथे माता निद्रा अवस्थेत (झोपलेल्या) आहे. हे मंदीर देखील उंच टेकडीवर असुन हेमाडपंथी आहे. भरपूर गावे ओलांडून ते त्र्यंबकेश्वरीस येऊन नासिक मार्गाने पंचकेश्वरीला व तेथुन कास्य गांवी (खेडे गावी) येऊन थांबले त्यावेळी भरपूर पर्जन्य होऊन विनिता नदीला महापुर आला होता. आता आपण व देवी पलीकडे कसे जाणार? का दुसऱ्या मार्गाने जावे ? अशा नानाविध प्रश्नांची मनाशी उत्तर देत डोंगरपुरी महाराज उभे होते याबाबत देवीचा विचार घ्यावा, म्हणून त्यांनी थोडीशी मान वळवली तर देवीचा दिव्य असा प्रकाश तेव्हाच एका जागी स्थित झाला होता. मागे वळुन बघण्याची चुक त्यांच्या लक्षात आली. डोंगरपुरी महाराज दुःखी झाले व त्यांना काहीही सुचत नव्हते. त्यांनी मनाला सावरुन घेतले. आता देवी येथे राहणार असणार तर मी नगरी कशास जाऊ? म्हणून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने देवीची यथायोग्य व शास्त्र जाणणाऱ्या ब्राम्हणांकडुन प्राणप्रतिष्ठा करुन घेतली. हिंगलाज मातेची सेवा केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रभव नाम संवत्सरास, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, गुरुवारी डोंगरपुरी महाराजांनी संजीवन समाधी शिष्य मंडळींसह घेतली. त्यावरील बांधकाम हे संभाजी मोरयाजी कुलकर्णी यांनी मौजे खेडेत (कारसात) बांधुन दिले. विनिता नदीच्या काठी ही समाधी बघावयास मिळते. या समाधीवर एक शिलालेखही कोरलेला दिसतो. मंदिराचे काम अतिशय सुक्ष्म रितीने केले असुन नक्षिदार बांधकाम आहे. मंदिर हेमाडपंथी रचनेचे असुन चिरेबद्ध आहे. समाधी स्थानावरती पुर्व रितीप्रमाणे महादेवाची पिंड स्वरुप असुन बाहेर द्वारपाल म्हणुन नंदिचे प्रतिक आहे. म्हणतात की, श्री हिंगलाज मातेला स्नान घातल्यानंतर त्याचे तिर्थ श्री डोंगरपुरी महाराजांच्या समाधी पर्यंत जाण्याची सोय होती, असोत ! हिंगलाज ही ज्वालारुप, पार्वती रुप आहे व तिचे तेज सहन करण्याची पात्रता शिवशंकरात आहे म्हणुनच तिला तीन नेत्र आहे.डोंगरपुरी महाराज हे देवीचे निस्सीम भक्त म्हणजे शंकराचाच भक्तीअंश अन् त्यावेळी आलेल्या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भंडारा करण्याचे ठरवले असावे म्हणून समाधी स्वरुपमध्ये शंकराची पिंड असुन बाहेर नंदीचीही स्थापना आहे.शंकरासाठी प्रिय मानल्या जाणाऱ्या श्रावण मासातच हा उत्सव करण्याची प्रथा रुढ झाली.अशा या संत श्रेष्ठ श्री डोंगरपुरी महाराज यांची आठवण ठेवण्यासाठी येथील भक्तजन, गोसावी व समस्थ ग्रामस्थ श्रावणातील तिसऱ्या सोमवारी डोंगरपुरी महाराज यांचा भंडारा करतात. या भंडाऱ्यात दूरवरुन लोक येऊन सहभागी होतात. समाधी संजिवन असल्यामुळे सहभागी भक्तजनांना त्याची चांगलीच प्रचीती येते. या भंडाऱ्यात पुजेचा व नैविद्याचा मान गोसावी समाजालाच दिला जातो. दशनाम गोसावी समाजामध्ये चार मठ येतात त्यामध्ये श्रृंगी मठ, जोशी मठ, गोवर्धन मठ व शारदा मठ येतात त्यापैकी डोंगरपुरी महाराज हे पुरी असल्याने श्रृंगी मठामध्ये येतात.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!