धोंडीराम रायते यांची तिसऱ्यांदा महाराष्ट्र माझा परिवार अध्यक्षपदी तर मुख्य समन्वयक पदी बाजीराव कमानकर यांची निवड
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिवार फाउंडेशन प्रणित महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा परिवाराच्या कार्यालयात नुकतीच संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी अध्यक्ष धोंडीराम रायते होते व्यासपीठावर संस्थाचे जेष्ठ सदस्य नगरसेवक प्रशांत दिवे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रायते, विठ्ठल उगले ,प्राध्यापक राजाराम मुंगसे, शिवव्याख्याते सुदाम खालकर, संजय डेर्ले, कवी रवींद्र कांगणे पत्रकार मुकुंद पिंगळे उपस्थित होते यावेळी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आला, परिवाराच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला यावेळी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, सचिन उगले, जावेद शेख, गणेश वाणी, वाळू जाधव यांनी परिवाराचे कार्य आणि लेखाजोखा मांडला,
जाणीव कर्तृत्वाची हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आहे, निव्वळ समाजकारणाचा वसा घेतलेल्या परिवाराने आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम, वंचित घटकांना मायेचा हात, गड किल्ले संवर्धन, रक्तदान शिबीर, परिवार भूषण पुरस्कार, आश्रमशाळा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू मुलांना साहित्य वाटप, सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप, गोदावरी नदीच्या तीरावरील गरीब, वेडसर लोकांना ब्लॅंकेट वाटप, आर्थिक सक्षमीकरण करणारी परिवार कल्याण बँकेची निर्मिती, शिवदर्शन दिनदर्शिका, असे सामाजिक कार्य वर्षानुवर्षे कार्य करत आहे यावेळी नूतन कार्यकारणीची निवड सर्वानुमते करण्यात आली अध्यक्षपदी धोंडीराम रायते, सचिवपदी शिवनाथ कापडी, मुख्य समन्वयक बाजीराव कमानकर, कार्याध्यक्ष बापू ढिकले, उपाध्यक्ष संजय जाधव, सरचिटणीस सौरभ बैरागी, चिटणीस शिवाजी हांडोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी तर आभार योगेश रायते यांनी मानले