बाजार समितीच्या सर्व घटकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा— सभापती सुवर्णा जगताप
निफाड प्रतिनिधी– ( रामभाऊ आवारे )
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामपंचायत विविध संस्था बाजार समिती आदींच्या माध्यमातून 100% लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवले असले तरीही अद्यापही काही समाजातील घटकांनी लसीकरण याचा लाभ घेतलेला दिसत नाही त्यामुळे त्यांना लसीकरण करणे गरजेचे असल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने लसीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकत निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण आयोजित केले असून बाजार समितीच्या सर्व घटकांनी लसीकरण याचा लाभ घ्यावा असे आव्हान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णा जगताप यांनी केले आहे.
सर्व शेतकरी बांधव, आडते, व्यापारी, माथाडी-मापारी कामगार, मदतनीस, कांदा चाळीवरील मजूर महीला , परप्रांतीय कामगार तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांना जाहीर आवाहन करण्यात येते की, लासलगाव शहर व आजुबाजुचा परिसर कोरोना मुक्त करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगाव वाकडा व लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने
मंगळवार, दि. 12/10/2021 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून सलग तीन दिवस महा लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी ज्या घटकांचे लसीकरण झाले नाही त्यांनी लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या बाजार आवारातील सभागृहाचे हाॅलमध्ये तसेच नवीन कांदा बाजार आवारातील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणास जाताना सोबत आधारकार्ड आणावे सदर लसीकरणांतर्गत कोविशील्ड डोस देण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त संख्येने आपण आपल्या कुटुंबातील सर्वांना लसीकरणचा लाभ मिळवून द्यावाअसेही सभापती सुवर्णा जगताप यांनी म्हटले आहे .