जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सवास सांप्रदायिक वातावरणात प्रारंभ– हभप शिवाजी महाराज देशमुख.
महोत्सवात दररोज ४००० भाविक ऑनलाईन पद्धतीने घेतात लाभ–
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
अखंड महाराष्ट्र वर शारदीय नवरात्र उत्सव पुरणाची सर्व शासनाचे नियम पाळत या भूत पूर्ण वातावरणात संपन्न होत असून या काळात आदिशक्तीचा मानसन्मान होऊन त्यांची महती संपूर्ण विश्वाला कळावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी असून साधू संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे. या अध्यात्मिक विचाराने प्रेरित होउन संत चरित्र गृप व तमाम ऑनलाइन भक्तिविधाते सज्जन मायबाप, बंधू भगिनींच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.०७ पासून दररोज रात्री ७.३० ते ८.३० या वेळेत शारदीय नवरात्रौत्सवास सांप्रदायिक वातावरणात प्रारंभ करण्यात आला असून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त होणाऱ्या जागर आदिशक्तीचा या प्रवचन महोत्सवात महाराष्ट्रातील किमान चार हजार भाविक दररोज ऑनलाईन पद्धतीने लाभ घेत असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा अध्यक्ष तथा गुरुवर्य शिवाजीराव देशमुख
यांनी दिली आहे.
प पु डॉ नारायण महाराज जाधव (आळंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली व भागवतानुरागी कविताताई साबळे, माऊली कन्या हभप दिपाली ताई घोडके यांच्या संकल्पनेतून हभप शारदाताई सूर्यवंशी व डॉ सौ लताताई पाडेकर (पुणे) यांच्या कुशल नियोजनात जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सवास अखंड महाराष्ट्रभर झूम ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रातील आळंदी,नेवासा, शेवगाव,बीड, परभणी, सातारा, सांगली, शेगाव, नासिक, निफाड ,धुळे ,श्रीरामपूर ,अहमदनगर, पाथर्डी,फलटण आदी जिल्ह्यातील ११ नामवंत महिला रामायणाचार्य, भागवताचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार मंडळींनी महोत्सवात सहभाग नोंदवला आहे.
जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सवात
भागवताचार्य हभप वर्षाताई महाराज काळे- कोकाटे (बीड), आई तुळजाभवानी माता तुळजापुर, ह.भ.प. अलकाताई महाराज रानडे (सिन्नर), आई सप्तश्रुंगी माता वणी (दिंडोरी), ह भ प डॉ सौ लताताई पाडेकर (पुणे),माहुरची रेणुकामाता माहुरगड यांनी उत्कृष्ट पद्धतीने सुंदर मांडणी करून चिंतन सेवा सादर केली असून १०ऑक्टोंबर रात्री ७.३० ते ८.३० यावेळेत ह-भ-प सुलोचनाताई सुलताने खामगाव (बुलढाणा),आई अंबाबाई अमरावती, व रात्री ८.३० ते ९ या वेळेत हिंगलाज माता देवी मंदिर पौराहित्य हर्षद पंगे (खेडे) यांचे हिंगलाज माता खेडे (हिंगलाजनगर), ११ ऑक्टोबर हभप.मीनाताई महाराज मडके (शेवगाव), मोहटादेवी पाथर्डी, १२ऑक्टोंबर हभप सिमाताई महाराज काळे (चांदवड), कालिका माता व रेणुका माता चांदवड,१३ ऑक्टोबर हभप भागवतानुरागी कविताताई साबळे (कोपरगाव), एकवीरा देवी कार्ले, १४ ऑक्टोबर ह.भ.प.कांताताई महाराज सोनटक्के ( जामखेड) जोगेश्वरी माता, १५ ऑक्टोबर ह भ प माऊली कन्या दिपाली ताई घोडके वाघोली (पुणे), जागर आदिशक्तीचा प्रवचन महोत्सव, समारोपीय काला किर्तन वाघोली (पुणे),वेळ सकाळी १० ते १२, रात्री ७.३०ते ८.३० वेळेत हभप सुनंदाताई जोशी (पुणे),कोल्हापुरची महालक्ष्मी माता याप्रमाणे चिंतन होणार आहे.
@@ संत चरित्र ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सवाचे हे सहावे पर्व अभूतपूर्व वातावरणात सुरू असून या पर्वाला ही महाराष्ट्रभरातून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे.तरी जास्तीत जास्त भाविक बंधू-भगिनींनी या ज्ञानामृताचा लाभ घ्यावा व शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपल्या हातून देवी-देवतांची पूजा-अर्चा, प्रार्थना, आराधना व महती लक्षात घेऊन आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करावा.
भागवताचार्य हभप दिपालीताई घोडके (पुणे) महोत्सव मुख्य प्रवर्तक.