अवकाळीने नुकसान झालेल्या द्राक्षांसह इतर पिकांचे तात्काळ पंचनामे करा-आमदार दिलीप बनकर
आ.बनकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे
निफाड तालुक्याच्या उत्तरपुर्व परिसरात काल सायंकाळच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी दाटुन वादळी वार्यासह काही वेळाकरीता गारपिट झाली या गारपिटनेे द्राक्ष पिकांसह टोमॅटो, सोयाबीन, मका, कांद्याची रोपे,मिरची आदी भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी पावसामुळे व गारपिटने निफाड तालुक्यातील कुंभारी परिसरातील प्रमुख पीक असलेल्या द्राक्ष बागा सोबत खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अशा सूचना आमदार दिलीप बनकर यांनी नुकसानग्रस्त द्राक्षउत्पादकांच्या बांधावर जाऊन प्रशासनाला दिल्या आहेत. याप्रसंगी तहसीलदार श्री.शरद घोरपडे व तालुका कृषी अधिकारी पाटील,मंडळ अधिकारी शितल कुयटे कृषी सहाय्यक कांबळे, तलाठी विठ्ठल पोटरे, ग्रामसेवक भरत कदम ,कुंभारीचे सरपंच राजेंद्र जाधव उपस्थित होते.
निफाड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून ढगाळ वातावरणासह काहि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहे त्यातच गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने व गारपिटने द्राक्षपिकांसह इतर पिकांना झोडपल्यामुळे उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करुन परकीय व नगदी चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकाच्या उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करून काबाडकष्ट करत पिकवलेल्या द्राक्ष पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सुरवातीला छाटणी करून दोन पैसे अधिक मिळतील या उद्देशाने उत्पादकांनी द्राक्षपिकांची लवकर छाटणी केली. छाटणी केलेल्या झाडांवरील नविन फुटव्याला या गारपिटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असल्याने शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी अवकाळी, मागील वर्षी कोरोना महामारी मुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कोरोणाच्या महामारी ने सर्व सीमा बंद असल्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष कवडीमोल भावाने विकावे लागले होते. त्यातच पुन्हा एकदा अवकाळीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार पर्जन्यवृष्टी करून होत्याचं नव्हतं करण्याचा प्रयत्न केला. अवकाळी पावसामुळे द्राक्षा सोबतच खरीप हंगामातील सोयाबिन ,मका, आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी लवकरात लवकर पंचनामे करावे आणि अहवाल सादर करावा अशा सूचना निफाड तालुक्यातील संबंधित अधिकारी वर्गाला आमदार बनकर यांनी यावेळी केल्या आहेत. यावेळी कुभारी येथील शेतकरी जयराम जाधव ,वाळु नाना जाधव ,नितिन विलास जाधव ,भानुदास पर्बत जाधव ,रघुनाथ जाधव,कचरू एकनाथ जाधव,पुंडलिक कारभारी जाधव,आदि उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रसंगी नुकसानग्रस्त द्राक्षउत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गारपिटने जखम झालेल्या झाडांवरील नविन फुटी काढुन तात्काळ उपाययोजना म्हणुन बाह्यस्पर्शी व आंतरप्रवाहि बुरशीनाशकांची फवारणी करावी ठिबक सिंचनद्वारे विविध प्रकारचे बुरशीचे जिवाणु सोडवे ज्यामुळे पांढरीमुळे सक्षमपणे कार्यरत होईल झाडांवरील गारपिटग्रस्त नविन फुटी बागेबाहेर काढुन टाकाव्यात व बागेताल पाण्याचा निचरा होईल याबाबींकडे लक्ष द्यावे.
मनोहर थेटे पाटिल संचालक द्रा बा संघ नाशिक विभाग.