भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी — तारुखेडलेची मुळ मुकाई माता—

नवरात्र विशेष करीता- ( रामभाऊ आवारे सर वनसगाव. mob.- 8788504512 )

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तारुखेडले हे गाव आहे या गावात १९७९ साला पासून ४२ वर्षा पासून मुळ मुकाई देवीची यात्रा भरते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून लाखो भाविक देवीच्या यात्रे साठी माघ शुद्ध दुर्गा आष्टमीला देवीची यात्रा भरते विविध लोक मनोरंजनाचे कार्यक्रम दोन दिवस गावामध्ये शांततेच्या वातावरणात पार पडतात भाविकांना मनोमन आनंद देणाऱ्या या यात्रे प्रसंगी देवीचे जागरण, अभिषेक, महाआरती तसेच देवीची गाणी असे अनेक कार्यक्रम या प्रसंगी व नवरात्र सणाच्या वेळी वर्षानुवर्षे पासून साजरे केले जातात ही यात्रा दोन दिवशाची असते
तारुखेडले गावा मध्ये गोदावरी नदी काठी देवीचे भव्य मंदिर आहे त्याच्या पुढच्या भागात मोठा सभा मंडप आहे
तसेच अभयआरण्य म्हणून निसर्ग रम्य परिसर असल्याने अनेक भाविक रात्रीच्या वेळी व दिवसा दर्शना साठी वेगवेगळ्या गाड्या घेऊन सार्वजनिक कार्यक्रम घेत असतात तसेच शाळा व कॉलेज मधील मुले व मुली सहली साठी येतात व प्रसंगी मंदिर परिसराची साफ सफाई करून परिसर स्वच्छ ठेवतात मुळ मुकाई देवीचे स्थान अखंड महाराष्ट्र तील कुलदैवत म्हणून प्रसिद्धीस आले आहे वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे जसे महात्म्य आहे तसेच तारुखेडले गावातील मुळ मुकाई देवीचे महात्म्य आहे तारुखेडले गावातील उंच डोंगरावर देवीचे स्वयंभू स्थान आहे भक्ताच्या नवसाला पावणारी व मनोकामना पूर्ण करणारी आराध्य देवी म्हणून रामायण काळा पासून ब्रिटिश काळा पर्यंत प्रसिद्धस आहे
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातुन अनेक श्रद्धाळू भाविक व देवीचे भक्त दर्शना साठी तारुखेडले गावात येतात दुसरे स्वयंभू स्थान पूर्वी कडे गोदावरी नदी काठावरती उंच जागेवर देवीचे स्वयंभू स्थान प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे किमान २००० वर्षा पेक्षा अधिक काळापेक्षा प्रसिद्ध आहे. गोदावरी नदी तुन मुळ मुकाई देवी हे जगदंबा माता महालक्ष्मी माता व माहूर गडाची रेणुका मातेचे मुळ स्थान आहे प्राचीन काळा पासून गोदावरी नदीतून देवीचे कार्यक्रम प्रसंगी जेवणासाठी विविध धातूचे आकर्षित भांडी त्या काळी नदीतून वर येत असे व कार्यक्रम झाला की भांडी नदीपात्रा जवळ ठेवायचे नंतर ती गायब होयची असा दिनक्रम व आश्चर्य त्या काळा मध्ये प्रसिद्धस आले आहे. मुळ मुकाई देवी म्हणजे मुक्या माणसाला बोलती करणारी वाच्या निर्माण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!