रावेर तालुका तलाठी व मंडळ अधिकारी यांची धरणे आंदोलन
निंभोरा सिम प्रतिनिधी-(योगेश पाटील)
श्री रामदास.जगताप_ साहेब राज्य समन्वयक यांनी केलेल्या अर्वाच्च भाषेबद्दल रावेर तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तहसील कार्यालयासमोरआंदोलन केले.
राज्यातील तलाठी मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान पारदर्शक करणे तसेच महसूल उत्पन्नात वाढ करून राज्याचा विकासाचा मार्ग प्रशस्त करणे व शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. महाराष्ट्र राज्य तलाठी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघाचे अध्यक्ष श्री डुबल आप्पासो यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्ती ई पीक पाहणी आणि मोफत सातबारा व आठ खातेदारांना वितरण यासंदर्भात मंगळवार दिनांक 5-10- 21 रोजी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शनपर राज्य कार्यकारिणी या व्हाट्सअप ग्रुप वर संदेश पाठवला होता तो अन्य ग्रुप द्वारे श्री रामदास जगताप साहेब यांना मिळाला त्यावर त्यांनी व्हाट्सअप ग्रुप वरच मूर्खासारखे मेसेज पाठवू नका असे लिहून श्री डुबल आप्पा यांना मूर्ख ठरवले आहे पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकून व नायब तहसीलदार यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे तीव्र स्वरूपाचा भावना दुखावल्यामुळे श्री रामदास जगताप साहेब यांची तत्काळ बदली करावी असे निवेदनात म्हटले आहे. त्यावेळी रावेर तलाठी संघ अध्यक्ष तडवी सचिव गुणवंत बारेला जिल्हा प्रतिनिधी अनंता खवले उपाध्यक्ष मीना तडवी नायब तहसीलदार शि.जी पवार मंडळ अधिकारी विठोबा पाटील जनार्धन भंगाळे राजेंद्र शेवळकर उपस्थित शरद पाटील गोपाळ भागत समीर तडवी यासीन तडवी प्रवीण वानखेडे रवी शिंगे रोशनी शिंदे अंजुम तडवी शीतल बावर ,तडवी दादाराव कांबळे ,हेमंत जोशी ,स्वप्नील तायडे, विजय शिरसाठ, प्रमोद नाय दे, निलेश पाटील ,निलेश चौधरी, भाग्यश्री बर्वे इत्यादी उपस्थित होते.