निंभोरा येथे जम्बो कोरोना लसीकरण सत्र संपन्न
निंभोरा बु प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे.9922358586 )
रावेर तालुक्यातील निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेमध्ये दि.8/9/2021. बुधवार रोजी जम्बो लसीकरण सत्र, कार्यक्रम घेण्यात आला.
लसीकरणासाठी पहिला, व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी महिला व पुरुषांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे गर्दी व गोंधळ न होता लसीकरण सुरळीत पार पडले.दिवसभर केंद्रात गर्दी झालेली होती. संध्याकाळ पर्यंत 749 ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला. शाळेत विजेच्या व्यवस्थेबाबत सहकार्य वीज वितरणाचे अरुण पाटील, जगदीश महाले,सुरज भोगे, यांनी केले.
निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, एस. एस. चौधरी, के. एस. महाजन,आर. एम. खाचणे, चंदन पाटील, पी. के. खिरडकर, सरिता महाजन, करुणा शिंपी, तसेच आशा सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, व लॅपटॅप बाबत डॉ. एस. डी. चौधरी, किरण सपकाळे राहुल महाले, ललित सोनार, गौरव कोंडे, प्रविण बारी, ऋषिकेश चौधरी, यांनी सहकार्य केले.निंभोरा पोलीस स्टेशनच्या वतीने स.पो. नि. स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश वराडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वंजारी यांनी चोख बंदोबस्त ठेऊन विशेष सहकार्य केले.
” निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत बुधवार रोजी निंभोरा येथे 749, तर वाघोदा येथे 520. लसीकरण डोस देण्यात आले या जम्बो लसीकरण सत्रास सर्वांचे सहकार्य मिळाले कोविड प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ” डॉ.चंदन पाटील आरोग्य अधिकारी.