नायगाव येथे डॉ.विवेक सोनवणे व बहुजन मुक्ती पार्टी यांच्या नेतृत्वाखाली दफनविधि आंदोलन
निंभोरा सिम – प्रतिनिधी – ( योगेश पाटील mob.- 9689388271 )
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जे दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात वर्षाकाठी सहा हजार रुपये या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. याच संदर्भात जळगाव जिल्ह्यातील पी.एम.किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभापासून जळगाव जिल्ह्यातील जवळपास पंचवीस ते तीस हजार शेतकरी वंचित आहे.मागील वर्षी केळीवर सी.एम.व्ही.नावाचा व्हायरस आला होता. त्या व्हायरस मुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अरबो रुपयांचे नुकसान झाले होते. मे महिन्यात जे चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले ती नुकसानभरपाई सुद्धा आद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या रक्कम जमा झाली नाही. याच सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी आज डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात दफनविधि आंदोलन पार पडले. या आंदोलनाची सांगता जिल्हा प्रशासनाकडून व मुक्ताईनगरचे नायब तहसिलदार श्री.प्रदीप झांबरे, श्री.वानखेडे, यांनी लेखी आश्वासन देऊन तात्काळ सर्व कामे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी आंदोलनकर्ते डॉ.विवेक सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सोंदळे,ब्रिजलाल इंगळे, तसेच मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक श्री.राहुल खताळ, पोलिस उप निरीक्षक श्री.निलेश साळूंके, तालुका कृषी अधिकारी श्री.माळी, गोपनीय चे श्री.गणेश मनुरे,श्री.मंगल साळुंके,पत्रकार, हेमंत पाटील, विठ्ठल धनगर, शकिर शेख, पंकज पाटील,. योगेश पाटील. शेतकरी, सुरेश पाटील, शैलेश पाटील, कमील रौफ, गौतम प्रधान, संजय बुवा, सचिन चौधरी, एकनाथ पाटील, एन. टी.महाजन, विवेक पोहेकर, उल्हास पाटील, पवन वानखेडे, मुकेश तायडे, किशोर महाजन, राम सोनार, वैभव पाटील,शांताराम बेलदार, रघुनाथ पोहेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.