जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा व लाक्षणिक उपोषण….

निंभोरा सिम प्रतिनिधी – ( योगेश पाटील )

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 15 आॅगस्ट 2021 रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व विलास भाऊ पांडे यांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा व लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात दिव्यांग कल्याणकारी योजना न राबविण्याच्या निषेधार्थ, जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फळवीमा योजनेपासून वंचित ठेवल्याच्या तसेच मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळ व सीएमवी व्हायरस मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याच्या निषेधार्थ व मुक्ताईनगर शहरवासीयांना दुषित पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या निषेधार्थ व मुक्ताईनगर नगरपंचायत स्थापन होऊन 4 वर्ष उलटूनही तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत मध्ये समावेश न केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ हे जन आक्रोश व लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे सांगितले आहे की, दिव्यांगासाठी येणाऱ्या योजना चा लाभ दिव्यांगांना परिपूर्ण मिळावा याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, केळी उत्पादक शेतकऱ्यांना फळवीमा योजनेपासून वंचित न ठेवता त्यांना फळवीमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा व चक्रीवादळ व सीएमवी व्हायरस मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व मुक्ताईनगर शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा. असे मागण्या करण्यात आल्या याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ.विवेक सोनवणे, अंतुली॔चे माजी सरपंच विलास पांडे, राहुल पाटील, रावसाहेब पाटील,चंदु वंजारी, चंद्रमणी शिरतुरे यांच्यासह दिव्यांग बांधव व शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!