सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी निंभोरा येथील देवी भक्तांनी केला ६०० किलोमीटर सायकलने प्रवास….

निंभोरा बु. प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे )

निंभोरा बु. ता.रावेर.येथील भास्कर शांताराम महाले वय ५७. व अरुण लक्ष्मण गोराडकर वय ५७. या दोन्ही देवी भक्तांनी वणी (नाशिक) येथील सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी सायकल ने निंभोरा येथून एक धाडसी योजना मनात आखून देवी दर्शनासाठी या भक्तांनी सायकल वारी केली. सुमारे ३०० किलोमीटर जाऊन तसेच ३०० किलोमीटर येऊन सुमारे ६०० किलोमीटर सायकलने प्रवास केला. ते सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेऊन परतले.या दोघ भक्तांनी सायकलने प्रवास करून दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. या दोघ देवी भक्तांचे निंभोरा बु. येथील शिवभारत गॅस एजेन्सी तर्फे त्यांचा पुष्पहार लघु वस्र श्रीफळ देऊन सत्कार,गौरव, शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास शेठ ढाके यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी वैभव ढाके, नरेंद्र ढाके, चंद्रकांत ढाके,पत्रकार आशिष बोरसे, सुनील सुधाकर कोंडे, माधुरी बऱ्हाटे, मुकेश चिखलकर ,भरत उमक, संजय नेहेते, हेमंत पाटिल, योगेंद्र पाटिल, प्रभाकर महाले यासह आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!