एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, वाहतूक ठप्प…ऐन सणात प्रवाशांचे हाल…
निंभोरा बु – ( प्रमोद कोंडे. mob.- 9922358586 )
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करण्यासह महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आगारातील कर्मचाऱ्यांनी रविवार सकाळ पासुन अचानक काम बंद आंदोलन सुरु केले.
जिल्ह्यातील सर्व आगारातील वाहतूक कर्मचारी आंदोलनामुळे ठप्प झाली आहे.
ऐन दीपावली सणात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होऊन पूर्ण पणे कामाचे नियोजन कोलमंडले आहे. ट्रॅव्हल्स भाड्यात ही विलक्षण वाढ झाली आहे. स्वतः स्ट्रीम ऑपरेशन केले नाशिक भाडे सावदा येथील एजंटने १६००.रु.सांगितले. स्थानिक पातळीवरही खाजगी वाहनाचा वापर सर्रासपणे होतांना दिसत आहे.खाजगी चालक मनमानी अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन प्रवाशांची लुट करीत आहे.
दिपावलीनंतर परतीचा प्रवास करणा-या प्रवाशांचे संपामुळे हाल होत आहे.रावेर आगारातील ५४ बसेसची सेवा ठप्प झाल्याने २१४ फे-या रद्द झाल्याने आगाराच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे.
एसटी सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा नाईलाजाने आधार घ्यावा लागत आहे.
निंभोरा खिर्डी रस्त्यावर निंभोरा स्टेशनलगत उड्डाणंपूलाच काम सुरु असल्याने बसेस या मार्गांवरील दीड ते दोन वर्ष झाले बंद आहेत. त्याचा फायदा रिक्षावाले घेत मनमानी भाडे सावदा ते खिर्डीचे घेत आहेत.
प्रवाशांचे एकच म्हणणे आहे हे आंदोलन, संप लवकर मिटावा. सणासुदीचा नाहक त्रास कमी व्हावा.कोरोना संसर्ग काळात बंद झालेल्या बसेस नेटक्या सुरु झाल्या, त्यात आता सणात संप, आंदोलन याच्याने प्रवाशांच्या नाकी नऊ आले आहेत.