निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत नवरात्री उत्सव, श्री.देवीच्या मुर्तींचे शांततेत विसर्जन..
निंभोरा बु – ( प्रमोद कोंडे. mob.- 9922358586 )
निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील खाजगी व सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळानी नवदुर्गा, आदिशक्ती जगदंबेला श्रद्धापूर्वक निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंधामुळे स्थापना व विसर्जन मिरवणुका निघाल्या नसल्यातरी श्री.आदिशक्ती दुर्गाभक्तांची असीम श्रद्धा प्रत्येक मंडळातील कार्यकर्त्यात ओसंडून वाहत होती. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याही वर्षी साध्या पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा केला. निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील परवानगी घेतलेल्या ४७ सार्वजनिक ,२३ खाजगी अशा एकुण ७० नवदुर्गा मंडळाच्या मुर्तींचे शांततेत विसर्जन करण्यात आले. श्री.नवदुर्गा विसर्जन विनावाद्य सायंकाळपर्यंत शांततेत पार पडले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गादेवी विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या मार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस निरीक्षक काशिनाथ कोळंबे, यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील, ना. पो. कॉ. स्वप्नील पाटील, हेड कॉन्स्टेबल राकेश वराडे, विकास कोल्हे, होमगार्ड संजय बोरसे, महेंद्र चांदोरकर, सागर तायडे.तसेच शांतता कमेटी सदस्य माजी प्रभारी सरपंच सुभाष पाटील महाराज, शांतता कमेटी सदस्य, माजी पं.स.सदस्य,जय भवानी मित्र मंडळ अध्यक्ष प्रमोद कोंडे. ग्रामपंचायत सदस्य अमोल खाचणे यांनी मंडळाला मार्गदर्शन करीत शांततेत श्री दुर्गा देवी विसर्जन पार पाडले.