पाणी पुरवठा करणारा पंप नादुरुस्त झाल्याने टँकर द्वारे वार्ड नं सहा मध्ये पाणी पुरवठा….

दसरा सणाच्या दिवशी ग्रामस्थांना दिलासा.

निंभोरा बु – ( प्रमोद कोंडे.9922358586 )

रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथील बलवाडी येथून पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पुरवठा पंप (सबमर्सिबल) नादुरुस्त झाल्याने, निंभोरा गावात होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. ऐन दसरा सणाच्या दिवसात वार्ड नं सहा मध्ये अडचण भासल्याने या संदर्भात वार्डातील ग्रामपंचायत सदस्य सौ. शाहीन दस्तगीर खाटीक ,व सौ.सुनंदा बिऱ्हाडे, तसेच सदस्य स्वप्निल गिरडे यांनी वरील जिव्हाळ्याच्या पाण्याच्या टंचाई,अडचणीवर मात करण्यासाठी निंभोरा गावचे सरपंच सचिन महाले यांच्याशी संपर्क साधून वार्ड क्रं. सहा मध्ये होणाऱ्या पाण्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत. तात्काळ दसरा सणासुदीत पाण्याचे टँकर देऊन अडचण भागविली, व ग्रामस्थांना सणासुदीच्या दिवसात दिलासा दिला.या उपक्रमाचे वॉर्डातून व गावातून समाधान व्यक्त होत आहे.
यासाठी निंभोरा बु.गावाचे सरपंच सचिन महाले ,उपसरपंच सौ.रंजना ताई पाटील, ग्रामसेवक व सर्व सदस्य वर्ग यांचे ही आभार वार्ड क्रमांक सहा मधील सदस्यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!