मूलभूत सुविधा कार्यक्रमाअंतर्गत निंभोरा बु. येथे गटार व काँक्रीटीकरण झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी – शेख नदीम

निंभोरा बु (प्रमोद कोंडे. 9922358586)

निंभोरा बु.ता. रावेर.येथे मूलभूत सुविधा २५१५ कार्यक्रमा अंतर्गत वार्ड क्रमांक ३ मध्ये सुदाम भोगे ते सुपडू भोगे यांच्या घरा पर्यंत गटारीचे व काँक्रीटीकरण चे नवीन काम आ. शिरीष चौधरी, यांच्या हस्ते मंजूर झाले. संबंधित ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपाचे दुरुस्ती करून निकृष्ठ दर्जाचे काम केले आहे. दोन ठिकाणी त्याच वार्ड परिसरात काम झाले असून नियम बाह्य झाले आहे. तरी याबाबत चे निवेदन गेल्या महिन्यापूर्वी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर यांच्या कडे दि.14/09/2021 रोजी लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे,तरी देखील बांधकाम विभागाकडून आज पर्यंत या कामाची चौकशी झाली नसून संबंधित ठेकेदारा सोबत अभियंत्यांचे काही साटेलोटे आहे का असा प्रश्न? उपस्थित होत आहे. तरी याबाबत संबंधित ठेकेदार यांची कामकाजाविषयी चौकशी व्हावी.बिलं काढण्यात येऊ नयेत अशी मागणी राष्ट्रवादी रावेर तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष शेख नदीम शेख सलीम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!