दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांना रेल्वे अँप्रेंटिस झालेल्या युवकांना रेल्वे नोकरीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे निवेदन सर्व शक्ती सेनेतर्फे देण्यात आले.

निंभोरा बु प्रतिनिधी (प्रमोद कोंडे.9922358586)

संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे अँप्रेंटीस शिप झालेल्या युवकांना रेल्वेमध्ये नोकरीत प्रथम प्राधान्य देणेबाबत सर्व शक्ती सेने मार्फत श्री. रावसाहेब दानवे रेल्वेमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील अॅप्रेंटीस झालेल्या व सध्या बेरोजगार असलेल्या युवकांना भारतीय रेल्वे सेवेच्या सेवेमध्ये गेल्या १५-२० वर्षापासून नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेले नसुन दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून त्याचबरोबर त्यांचे वय देखील बाद होण्याच्या मार्गावर आहे. आपण रेल्वे खात्याचे मंत्री झाल्याने या युवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांना आपल्याकडून काही घोषणा होईल या आशेने ते आपणाकडे पाहत आहेत.तरी आपण या प्रकरणाकडे काळजीपूर्वक व पोटतिडकीने लक्ष घालून रेल्वे खात्यात संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना प्रथम प्राधान्य द्याल तसेच आपण हा अत्यंत जिव्हाळ्याचा व उदरनिर्वाहाचा व युवकांच्या भविष्यात विचार केल्यास भविष्याचा प्रश्न सुटेल. भविष्यात होणाऱ्या रेल्वे भरतीमध्ये महाराष्ट्रातील युवकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे,अशी मागणी सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष नीरज शेठी,सर्व शक्ती सेना राष्ट्रीय सचिव नीरज गुप्ता, सर्व शक्ती सेना तथा भाजपा अनु.जा. मोर्चा महाराष्ट्र सचिव प्रा.संजय मोरे (अण्णा), सर्व शक्ती सेना जिल्हा विद्यार्थी संघटक कृष्णा सावळे यांनी केली आहे.

त्याप्रसंगी निवेदन रेल्वे मंत्री स्वियसहाय्यक निखिल गोस्वामी यांना निवेदन देतांना- सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष नीरज शेठी,सर्व शक्ती सेना राष्ट्रीय सचिव नीरज गुप्ता, सर्व शक्ती सेना तथा भाजपा अनु. जा. मोर्चा महाराष्ट्र सचिव प्रा.संजय मोरे (अण्णा), तत्पर फाउंडेशन चे सचिव,दै.सकाळ चे पत्रकार प्रवीण धुंदले, सर्व शक्ती सेना जिल्हा विद्यार्थी संघटक कृष्णा सावळे,सर्व शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष दिपक चौधरी, सर्व शक्ती सेना रावेर तालुका अध्यक्ष संदीप गाढे, सर्व शक्तीसेना रावेर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र सपकाळे, सर्व शक्ती सेना युवक रावेर तालुका अध्यक्ष नितीन गवई, सर्व शक्ती सेना अनु.जाती मोर्चा रावेर तालुका उपाध्यक्ष दिपक वानखेडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!