जिल्हा नियोजन समिती तर्फे निंभोरा बु. वार्ड क्र.६. मध्ये इलेक्ट्रिक पोल मंजूर – स्वप्निल गिरडे याच्या प्रयत्नास यश.
निंभोरा बु प्रतिनिधी -( प्रमोद कोंडे. Mob no- 9922358585 )
रावेर तालुक्यातील निंभोरा बु.येथे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गिरडे यांच्या सततच्या पाठपुराव्यांने आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हा नियोजन समिती कडून १७.इलेक्ट्रिक पोल निंभोरा.बु.येथील वार्ड नं.६. मधील परिसरात मंजूर केले. गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांच्या घराकडे अंधारमय वातावरण असायचे ग्रामस्थांनाअनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे.
निंभोरा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचीत सदस्य स्वप्निल गिरडे, यांनी याबाबतचा पाठपुरावा करून आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे इलेक्ट्रिक पोल मिळण्या संदर्भात मागणी केली असता आमदार शिरीष चौधरी यांनी तात्काळ जिल्हा नियोजन समितीत प्रकरण मंजुर केले.व ते पोल तात्काळ वार्ड क्र.६. मध्ये लावण्यात आले.याबाबत छोटु पाटील, धनंजय चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहीती ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गिरडे यांनी दिली.