काश्मीर (श्रीनगर) येथे आतंकवादी यांनी भरदिवसा शिक्षकाची गोळी मारून क्रुर हत्या केली त्या घटनेचा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निंभोरा. बु.- ( प्रमोद कोंडे.9922358586 )

नवरात्री उत्सव घटस्थापनेच्या या शुभदिनी काश्मीर (श्रीनगर)येथे आतंकवादी यांनी भर दिवसा शाळेत सतींदर कौर मुख्याध्यापक , दिपकचंद , मखनलाल कुंडू यांना गोळी मारून भरदिवसा हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी अशी आहे. गुरु संपुर्ण भारत देशासह महाराष्ट्रात युवा पिढीला घडऊन संपुर्ण भारत देशाचे भवितव्य घडवितात अशा गुरुची भर दिवसा क्रूर हत्या करणे हे भारतीय राज्य घटनेचे विरुद्ध आहे त्याच प्रमाणे , बिहार मध्ये पाणी पुरी विकणाऱ्या दलीत युवकाची आतंकवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. तरी या विध्न संतोषी माथेफिरू नराधमाला त्वरित अटक करून सुप्रीम कोर्टा मार्फत चौकशी करून लखिमपूर खिरी प्रमाणे मृत व्यक्तीच्या परिवाराला 1कोटी 50 लाख रुपये केंद्राने मदत दयावी.अशी मागणी सह झालेल्या घटनेचा सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी,प्रा. संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष , कृष्णा सावळे, विजय तायडे, धनराज कोळी, गजानन काडेले, सतिष गाढे, राजेंद्र सपकाळे, दिपक चौधरी, दीपक वानखेडे, व सर्व शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत मा. जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!