तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारिणी जाहीर..
निंभोरा बु – ( प्रमोद कोंडे. mob.- 9922358586 )
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अंर्तगत तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारणीची बैठक रविवारी दि.३ सप्टेंबर रोजी नुकतीच वरणगांव येथे संपन्न झाली. या बैठकी मध्ये संजय काशिनाथ निंबाळकर (वरणगांव) ता. भुसावळ यांची अध्यक्षपदी निवड झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव गोपाळ चौधरी होते. संजय निंबाळकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या संघटनेमध्ये सहा तालूक्यामधील वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश आहे. या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष राहूल विजय सोनी (जामनेर) सचिव गणेश बाजीराव पाटील (उटखेडा) ता. रावेर, सहसचिव नितिन सुरेश बाणाईत (सांगवी) ता.यावल, कार्याध्यक्षपदी जिवन चौधरी (यावल) संघटक किसन बापू काळे (बोदवड) संपर्कप्रमुख उज्वल जगन्नाथ मराठे (तळेगाव) ता. भुसावळ, सल्लागार शांताराम लाठे (पहूर) ता. जामनेर, सदस्य अजिंक वाणी (रावेर) महेश वाणी (यावल) प्रल्हाद महाजन (बलवाडी) ता. रावेर, श्रीकांत कुलकर्णी (भुसावळ) विकास पाटील (सावदा) यांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेत विविध ठिकाणच्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली असून त्यांच्या मागणीचा पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे संघटना अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. प्रमोद चौधरी (सावखेडा), राजेश गुरव (निंभोरा), दिलिप चांदवे (दसनूर ), गोपाळ बोंडे ( कुंभारखेडा), राजेंद्र देशमुख (यावल), विनोद सैतवाल (चिनावल), ज्ञानेश्वर विचवे (विवरा), अतुल मुहूलकर (जामनेर), समाधान पाटील (फत्तेपूर), सुनिल सोनी (जामनेर), मनोज माळी (तळेगांव), प्रमोद कासार (शेंदूर्णी), विजय जैन ( शेंदूर्णी) आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रल्हाद महाजन यांनी केली. तर आभार राजेश गुरव यांनी मानले.