निंभोरा स्टेशन परिसर जि.प.शाळेत लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधीं जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न

निंभोरा बु.- ( प्रमोद कोंडे )

निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथे स्टेशन परिसरातील जिल्हा परिषद शाळेत जय जवान,जय किसान’चा मंत्र देणारे भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच सत्य अन् अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून शनिवार दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी निंभोरा जि.प.शाळा स्टेशन परिसर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे तसेच मुख्याध्यापक पल्लवी राणे, शिक्षक वृंद माधुरी भदाने ,श्री विशाल सोनवणे , विविध मान्यवर यांनी प्रतिमेस विनम्रपणे अभिवादन केले. याप्रसंगी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत स्वच्छता अभियान, राबवण्याचे ठरले. ‘कोविड-19’अंतर्गत लसीकरण, मोहीम साठी जनजागृती करणे. तसेच स्वच्छता अभियान सप्ताह साजरा करणे . या बाबत चर्चा करण्यात आली. प्रतिमापूजन करून मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत अभिवादनही करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे, शोएब खाटीक, दस्तगीर खाटीक,जयेश मोरे अक्षय तायडे, तुषार बाविस्कर, हर्षल तायडे , स्वप्नील मोरे, धीरज काळे चंद्रकांत कुऱ्हे, शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचेही मनोगत
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त बालमित्र विशाखा तायडे, नेहा पाटील, प्रिया पाटील, श्वेता पाटील, आरुषी तायडे ,कपिल सपकाळे, ऋषिकेश तायडे, यासह बालगोपाळांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!