शेतकऱ्याच्या मालाला सरकारने ठरविलेला हमीभाव मिळण्यासाठी खा. रक्षा खडसे यांना देण्यात आले निवेदन.
निंभोरा बु.- ( प्रमोद कोंडे.9922358586 )
खासदार रक्षा खडसे यांना कृषी मालाच्या भावावर नियंत्रण आणि नियोजन ठेवावे. तसेच शेतकऱ्याच्या मालाला सरकारने ठरविलेला हमीभाव मिळावा यासाठी युवा प्रतिनिधी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात दिले निवेदन. त्या वेळेस उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रंजना ताई पाटील, पंचायत समिती सभापती कविता ताई कोळी होते.
सरकारने ठरविलेल्या शेती मालाच्या यात कापूस, सोयाबीन यांचे हमीभाव ठरलेले असुन त्या पेक्षा कमी भावाने व्यापारी खरेदी करत आहे.त्यासाठी योग्य ती व्यापाऱ्यांवर कारवाई करून भावाबाबत नियोजन करण्यात यावे. सध्याच्या कोरोना सारख्या महामारीतून तसेच नैसर्गिक आपत्ती या संकटापासून शेतकरी हादरलेले आहेत. त्यात व्यापारी लुट थांबत नाही. यासाठी आमच्या सारख्या शेतकऱ्यांसाठी योग्य व ठरलेला हमीभाव मिळावा व त्यावर नियंत्रण रहावे म्हणून खासदार रक्षा खडसे यांना प्रशांत काठोके,निंभोरा बु. संदीप कोळी, वाघाळी यांनी दिले निवेदन.