सांडपाणी नाल्याचे क्षेत्र कमी झाल्याने निंभोरा गावात रोडावर पाणीच पाणी जमा होऊन नदीचे स्वरूप

निंभोरा बु.- ( प्रमोद कोंडे. mob.- 9922358586 )

पाऊसाचे पाणी निंभोरा गावात थोडेफार ही पडले तरी गावात चहुबाजुंनी रस्त्यावर पायाच्या गुडग्यांपर्येंत पाणी जमा होते. गावातील मेन रोडाच्या दुतर्फा गटारीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने गटारी तुडुंब सतत भरलेल्याच असतात. त्यात पाऊसाचे पाणी जोरात पडल्यास सर्व गावातील पाणी रोडावरच जमा होते. त्यामुळे मोटरसायकली चालवतांना कसरत करत पाण्यातून रस्ता पार करावा लागून मोटार सायकल धारकांचे नुकसान होत आहे.
गावाच्या सांडपाण्याच्या नाल्याचे क्षेत्र ही आजूबाजू अतिक्रमण झाल्याने कमी झाले आहे. त्यात रेल्वे विभागाने पुलाजवळ सांडपाणी अडविलेले असल्यामुळे सांडपाणी निचरा व्यवस्थित होत नाही पाणी अडकून गावातच मेन रोडावर जमा होते.जास्त करून पाणी दसनूर रस्त्यालगत, कोळी वाडा नाल्याजवळील प्लॉटिजवळ, बसस्टँड जवळ नदीचे स्वरूप मेन रोडावर तयार होऊन नदी गावातून वाहत आहे असे वाटते.निंभोरा ग्रामपंचायतचे मेन दुतर्फा गटारीकडे दुर्लक्ष झाल्याने पाऊसाळ्यातच काय इतर दिवशीही दुर्गंधी युक्त पाणी मेन रोडावर वाहत असते.

“दसनूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी जमा झाल्याने कोळी वाडा प्लॉट परिसरातील लोक त्रस्त झाले असून जीव मुठीत घेऊन मार्ग काढत पुढचा प्रवास करावा लागतो. दसनूर मोरी जवळ पाईप टाकून पाऊसाचे पाणी गटार मध्ये उतारण्याची गरज आहे. सरपंच, ग्रामसेवक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी.व कचऱ्याचे नियोजन लावावे, सर्व कचरा पाणी पडल्यास गटारीत जमा होतो व गटारीही तुडुंब भरतात ” सामाजिक कार्यकर्ता शरद तायडे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!