वडगांव येथे नेहरू युवा केंद्र जळगांव अंतर्गत फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 कार्यक्रमाचे आयोजन..!
निंभोरा बु. – ( प्रमोद कोंडे. mob.-9922358586 )
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव, तसेच नेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र सलग्नित आदर्श युवा मंडळ वडगांव तालुका रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने वडगांव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात रन इंडिया, फिट इंडिया, स्वच्छ भारत निर्मल भारत, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या.
सदरील कार्यक्रम नेहरू युवा केंद्र जळगांवचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका समन्वयक आनंदा वाघोदे यांनी काम पाहिले.वडगांव येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक युवराज वारके सर यांनी आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे. असा संदेश देत रॅलीची सुरुवात केली. तसेच वडगांव गावचे सरपंच धनराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत युवकांनी राष्ट्र निर्मितीसाठी आपले योगदान दिले पाहिजे असा संदेश देत कार्यक्रम संपन्न करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित गावचे ग्रामपंचायत सदस्य शकील तडवी, उपशिक्षक राकेश शिंदे सर, वडगांव पोलीस पाटील संजय वाघोदे, गाते गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज वाघ, महिला बचत गटाच्या सी.आर.पी जयश्री वाघोदे, एफ.एल.सी.आर. पी सुषमा वाघोदे ग्रा.पं.शिपाई नितीन वाघोदे, नेचर हार्ट फाऊंडेशनचे सदस्य सचिन (टेलर) वाघोदे, सुरेश वाघोदे, निलेश वाघोदे, चेतन वाघोदे, पंकज वाघोदे, गोविंदा वाघोदे, तुषार वाघोदे, आदर्श युवा मंडळाचे अध्यक्ष विनायक वाघोदे सचिव अक्षय वाघोदे, किशोर लहासे, सागर वाघोदे, रामकृष्ण वाघोदे,राजेंद्र वाघोदे, तोफिक तडवी, मुसा तडवी,समराज तायडे,दीपक पाटील, तसेच आदी ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.