निंभोरा येथील अर्शद पिंजारी यांची भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या तालुका सचिवपदी निवड
निंभोरा बु – ( प्रमोद कोंडे.9922358586 )
निंभोरा बु. तालुका रावेर येथील युवा कार्यकर्ते अर्शद मुनाफ पिंजारी यांची भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या रावेर तालुका सचिवपदी निवड करण्यात आली. याबाबतचे निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष राज खाटीक यांनी रावेर येथे बैठकीत दिले. यावेळी जिल्हा सदस्य धनश्री ठाकरे, गिरीश पाटील, उपाध्यक्ष दिपेश भुसे, अक्षय महाजन, पियुष बऱ्हाटे, हर्षा सरोदे, गौरव महाजन,गौरव काटोले, मित्र मंडळी उपस्थित होते.