निंभोरा पोलीस स्टेशन परिसरात श्री. गणेश विसर्जन शांततेत.
निंभोरा बु. प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे. 9922358586 )
रावेर तालुक्यातील निंभोरा स्टेशन परिसरातील दि.19. रविवार. अंनत चतुर्दशीला निंभोरा व परिसरातील गावात शांततेत व भक्तिमय वातावरणात श्री. गणेशाचे विसर्जन करण्यात आले. सकाळ पासून मंडळानी श्री. गणेश मूर्तिचे विसर्जन केले. माजी प्रभारी सरपंच सुभाष पाटील ( महाराज ) यांनी जय भवानी मित्र मंडळाच्या गणेश मूर्तिचेदर्शन घेऊन विसर्जनाच्या वेळेस श्री. लम्बोधर विघ्नहर्त्याची आरती करून श्री.गणेशजी बाप्पांचा निरोप घेत, विघ्नहर्त्या गणेशाला सर्वांनीच कोरोनापासून सर्वांना मुक्ती दे, दृष्ट प्रवृत्ती पासून सर्वांचे रक्षण कर, असे गणरायाला साकडे घातले. ह.भ.प. सुभाष महाराज यांनी मंडळाच्या कार्यकर्तेयांचे आभार व्यक्त केले. 22 वर्ष आज या मंडळास होत आहे.
दरवर्षी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम या मंडळाकडून दरवर्षी घेतले जातात. परंतु दोन वर्ष झाले. कोरोना संसर्ग महामारीमुळे सर्व कार्यक्रमावर संक्रात कोसळली आहे. तरी कार्यकर्त्यांचा जोश व उत्साह तसाच कायम आहे. जय भवानी मंडळाचा गणपती गावातून विसर्जनास जात असतांना आठवडे बाजार चौकात कार्यकर्ते, भक्त मंडळी व माजी प्रभारी सरपंच श्री.ह.भ. प.सुभाष महाराज पाटील व निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा यंत्रणान्वय आठवडे बाजार चौकात उपस्थित होती.