रावेर तालुक्यात ई पिक पाहणीसाठी तहसिलदार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर…..

निंभोरा.बु।। – प्रतिनिधी ( प्रमोद कोंडे.९९२२३५८५८६ )

रावेर तालुक्यात ई पिक पाहणीसाठी तहसिलदार उषाराणी देवगुणे स्वत: शेतक-यांच्या बांधा पर्यंत जाऊन त्यांनी ई- पिक पेरा नोंदवण्यासाठी शेतक-यांना आवाहन केले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून त्यांचा पिक पेरा स्वत: त्यांनाच ऑनलाइन करायचा असून शासनाकडून यासाठी व्यापक पध्दतीने प्रसिद्धि केली जात आहे.

माझी शेती माझा सात – बारा, मीच भरणार माझा पिकपेरा महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.जमीन / २०१८ / प्रक्र ९२ ( भाग – १ ) ज .१ अ दि. ३० जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार शेतक – यांनी स्वतः आपल्या शेतातील पीक पेरा भराण्या कामी “ ई पिक पाहणी ” अॅपचे प्रशिक्षण गावोगावी व व्यापक प्रसिध्दी देऊन शेतकऱ्यांना पीक पाहणी अॅप द्वारे पिक पेरे भरण्याचे प्रशिक्षण तलाठी , मंडळ अधिकारी यांचेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. तथापी शेतक – यांनी ई – पीक पाहणी अदयाप पावेतो पुर्ण केलेली दिसुन येत नाही .पीक पाहणी भरण्याची दि. १५ सप्टेबंर २०२१ या दिवसापर्यंत मुदत होती.परंतु शासनामार्फत दि. ३० सप्टेबंर २०२१ पर्यत सदरची मुदत वाढविण्यात आलेली आहे.सदर पीक – पेरेच्या नोंद न झाल्यास पिक विमा भरडधान्य खरेदी व इतर शासकीय कामांना अडचण निर्माण होऊ शकते. तरी शेतकऱ्यांनी आपले शेतीचे पीक पेरे तात्काळ स्वत : नोंदवून घ्यावे असे आवाहन महसुल विभागाकडुन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!