निंभोरा बु. वार्ड क्र.६.मध्ये लोकप्रतिनिधींना सांगूनही कामे होत नसल्याने युवकांनी स्वतः पुढाकार घेत कचऱ्याची लावली विल्हेवाट.
निंभोरा बु.- प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे. 9922358586 )
निंभोरा बु.वार्ड क्र.६ येथील लोकप्रतिनिधींना त्रस्त झालेल्या युवकांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीची व प्रस्थापितांची लाचारी संदर्भित करून स्वतः स्थानिक जागेवरील कचऱ्याचे स्वतः व्यवस्थापन करून एका उत्तम अशा सामाजिक कार्याचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलेले आहे!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीला व वार्डातील लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही कामे होत नसल्याने व्यथित युवकांनी वैयक्तिक कामे सोडून स्वतः ग्रा.प. सदस्यांची कामे करावी लागत आहे यापेक्षा मोठ दुर्दैव दुसर काय असू शकते.
वार्ड क्र.६ . अर्थात निंभोरा बु|| या गावातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला वार्ड, जिथे नेहमीच अनेकानेक समस्या उद्भवत असतात त्यापैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे कचरा व घाणीच साम्राज्य, तसेच दिवाबत्तीवर दुर्लक्ष. गेल्या निवडणुकांमध्ये बहुतांश उमेदवारांनी स्थानिकांच्या झोळीत असंख्य आश्वासने टाकली, ज्यांना स्थानिक रहिवाशी बळी पडले व या उमेदवारांना निवडून दिले, पण निवडून आलेल्या सदस्यांना जवळ-जवळ १० महिने होण्यात आलेलं आहे तरी देखील लोकप्रतिनिधींच्या त्या वचनांचा अजूनही साक्षात्कार जनतेला झालेला दिसत नाहीय असा रोष स्थानिकांचा आहे!
या वार्डातील युवकांनी स्वतः पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले.स्वच्छता अभियानास उपस्थित कार्यकर्ते ललित पाटील, आकाश बोरसे, संदीप मोरे, नवाज पिंजारी, अतुल येवले, योगेश भोंगे, राजू महाजन, पंकज पाटील, उमेश पाटील, लखन पाटील, गणेश राजपूत, वेदांत विचवे, गुणेश ठाकरे, मयूर चोपडे यांचा सहभाग होता.
अशी स्थिती निंभोरा बु.गावात बहुतेक वार्डात आहे. नियोजन बद्ध ग्रामपंचायतीचे काम नसल्याने अशा अडचणी दिसून येत आहे. दिवाबत्ती विषयी ही अनेक तक्रारी आहेत.बहुतेक भागात घाणी बरोबर अंधाराचे साम्राज्य आहे.सांगितल्यावरही लाईटाची व्यवस्था केली जात नाही. ग्रामसेवक गणेश पाटील यांना सांगूनही अजून पर्यंत गावात लाईट लावले गेले नाहीत अशी स्थिती आहे.