ऐनपूर महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाचे उदघाटन व शिक्षक दिन संपन्न

बोलतांना प्राचार्य डॉ. जे.बी अंजने सोबत, डॉ. पंकजकुमार नंन्नवरे, डॉ. पी.आर.महाजन, प्रा.व्ही.एन.रामटेके

शिक्षक समाज घडविण्याचे कार्य करीत आहेत- प्राचार्य डॉ जे बी अंजने

निंभोरा बु. प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे.9922358586 )

निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच असलेले ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाचे उदघाटन व शिक्षक दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन ५ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते. विद्यार्थी विकास विभागाचे उद्घाटन डॉ पंकजकुमार नन्नावरे, संचालक, विद्यार्थी विकास राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी केले. त्यांनी उद्घाटन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थी हित जोपासले पाहिजे विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त विकास कसा होईल हे पाहण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांनी हे पहिले पाहिजे आणि तसे काम केले पाहिजे असे त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले.

शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहिले पाहिजे. शिक्षक दिनानिमित्त कु.श्रुती कीशोर पाटील या विद्यार्थिनिने मनोगत व्यक्त केले व कविता सादर केली. शिक्षक दिनानिमित्त प्रा.डॉ.प्रविण महाजन यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी अंजने यांनी वैश्विक शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून प्रत्येक शिक्षकाने शांती आणि संयम बाळगून विद्यार्थ्यांशी व्यवस्थित संवाद साधून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मैत्री निर्माण करावी. आदर्श समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतो. त्यासाठी शिक्षकांच्या अंगी आदर्श गुण असले पाहिजे. असे त्यांच्या अध्यक्षीय समारोपा मध्ये त्यांनी विचार मांडल्या.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक विनोद रामटेके यांनी केले व त्यांनी प्रास्ताविकामध्ये आतापर्यंत होऊन गेलेले सर्व शिक्षक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाला ८६ विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,नागरिक आणि संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. मान्यवरांचे आभार डॉ.संदीप साळुंके यांनी मानले. कार्यक्रम आयोजनासाठी सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ आर व्ही भोळे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नीता वाणी, डॉ संदीप साळुंके व सर्व प्राध्यापकांनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!