प्राथमिक आरोग्य केंद्र निंभोरा बु चे लसीकरण करण्याबाबत तालुक्यात रेकॉर्ड नं. १.
निंभोरा बु।। – प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे. mob.- ९९२२३५८५८६ )
निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दि. ४/९/२०२१ रोजी covid-19 लसीकरण सत्र खालील प्रमाणे आयोजित करण्यात आले होते.उपकेंद्र खिर्डी बु ६६१ डोस व उपकेंद्र दसनुर येथे ६५९ असे एकूण १३२० लसीकरण डोसचे काम झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र निंभोरा बु अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ .चंदन पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्यअधिकारी डॉ. सचिन पाटील, डॉ. प्रतीक पाटील, डॉ. रेखा पाटील,अजित राणे, एम. के.बावस्कर, एस.बी.पाटील, ज्योती भोलाणे, संगीता महाजन, पुष्पा टोंगळे, विद्या शिंपी,आरोग्य सहाय्यक आरोग्य सेविका आरोग्य सेवक चंदन पाटील, कैलास महाजन, आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांसर्वांनी अति परिश्रम करून संध्याकाळी सात वाजेपर्यंत १३२० लसीकरण डोस पूर्ण करण्यात आले. तालुक्यात कमी कर्मचारी बळ असतांनाही विक्रमी असा आकडा साध्य करण्यात आला. एकाच दिवशी १३२० डोस आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तन-मन-धन करून काम पूर्ण केले व तालुका स्तरावर आतापर्यंत सर्वात जास्त लसीकरणाबाबत निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राने रेकॉर्ड केले.
त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले.