मातृवंदना सप्ताह, पहिल्या अपत्यासाठी मिळणार गरोदर मातांना पाच हजार रुपये..
निंभोरा.बु।। प्रतिनिधी -( प्रमोद कोंडे )
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जिल्हाभरात १ते ७ सप्टेंबर दरम्यान मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार असून यात पहिल्या अपत्यासाठी गरोदर मातांना तीन टप्यात पाच हजाराची मदत मिळणार आहे. शासकीय सेवेत असणाऱ्यांना वगळून सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
गरोदर महिलांनी तातडीने नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी १ ते ७ या सप्ताहात या कार्यक्रमाची विशेष मोहीम जनजागृती करून राबविण्यात येणार आहे. गरोदर महिलांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय यंत्रणेत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या साठी रुग्णालयात जाऊन नोंदणी करून घ्या.
तीन टप्यात मिळणार गरोदर मातांना पैसे, पहिला टप्पा एक हजार रुपये, दुसरा, तिसरा दोन, दोन हजार रुपये यासाठी आधारकार्ड, बँकखाते पुस्तकं झेरॉक्स, बाळाचा जन्म नोंदणी दाखला, लसीकरण याबाबी पूर्ण केल्यास हा लाभ मिळणार आहे.